Weekly Horoscope: मेष, वृषभ, मिथुन, कर्क राशींचे साप्ताहिक राशीफळ; घरी डबल आनंद येणार, अर्थलाभ

Last Updated:
Weekly Horoscope: नोव्हेंबर महिन्याचा तिसरा आठवडा अनेक राशींना शुभफळ देणारा ठरू शकतो. या आठवड्यात ग्रहांचे शुभ संयोग होत आहेत, त्यांचा राशींवर कसा परिणाम होईल जाणून घेऊ. एकंदरीत ग्रहस्थितीचा मेष, वृषभ, मिथुन, कर्क राशींवरील साप्ताहिक परिणाम जाणून घेऊ.
1/7
मेष: मेष राशीच्या लोकांसाठी हा आठवडा शुभ आहे. या आठवड्यात तुम्ही जो काही प्रयत्न कराल, त्याचे सकारात्मक परिणाम मिळतील. आठवड्याच्या सुरुवातीला तुमची बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित असलेली कामे वेगाने पूर्ण होताना दिसतील, तुम्हाला सर्वांचे सहकार्य मिळेल. नवीन नोकरीची इच्छा पूर्ण होईल. नोकरी करणाऱ्या लोकांच्या कामाचे अधिकारी कौतुक करतील. बक्षीस म्हणून मोठे पद मिळू शकते. आर्थिक स्थिती चांगली होईल. आठवड्याच्या मध्यात दीर्घकाळची इच्छा पूर्ण झाल्याने मन प्रसन्न होईल. व्यवसायात फायदा होईल, व्यवसाय वाढेल.

advertisement
2/7
मेष राशीच्या लोकांना जमीन आणि इमारतीच्या खरेदी-विक्रीतून नफा होईल. आठवड्याच्या उत्तरार्धात, तुम्हाला धार्मिक शुभ कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल. प्रेमसंबंधात जुळवून घेण्याची भावना राहील. तुम्हाला एकमेकांना जाणून घेण्याची आणि समजून घेण्याची संधी मिळेल. कुटुंबासोबत आनंदी क्षण घालवता येतील. वैवाहिक जीवन आनंदी राहील. सासरच्या लोकांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. आरोग्याच्या दृष्टीने हा आठवडा ठीक राहणार आहे.लकी रंग: निळा
लकी नंबर: १५
मेष राशीच्या लोकांना जमीन आणि इमारतीच्या खरेदी-विक्रीतून नफा होईल. आठवड्याच्या उत्तरार्धात, तुम्हाला धार्मिक शुभ कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल. प्रेमसंबंधात जुळवून घेण्याची भावना राहील. तुम्हाला एकमेकांना जाणून घेण्याची आणि समजून घेण्याची संधी मिळेल. कुटुंबासोबत आनंदी क्षण घालवता येतील. वैवाहिक जीवन आनंदी राहील. सासरच्या लोकांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. आरोग्याच्या दृष्टीने हा आठवडा ठीक राहणार आहे.लकी रंग: निळालकी नंबर: १५
advertisement
3/7
वृषभ रास: वृषभ राशीच्या लोकांना या आठवड्यात आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी खूप घाम गाळावा लागेल. या आठवड्यात अपेक्षित यश मिळवण्यासाठी आळस आणि अभिमान सोडून कठोर परिश्रम करावे लागतील. आठवड्याच्या सुरुवातीला आर्थिक स्थिती चांगली नसेल. या काळात खर्चापेक्षा पैशांचा ओघ कमी असेल. व्यावसायिकांना व्यवसायात चढ-उतार दिसतील. तुम्हाला तुमच्या करिअर आणि व्यवसायात तुमच्या प्रतिस्पर्धकांशी कडवी स्पर्धा करावी लागू शकते.

4/7
वृषभ - आठवड्याच्या मध्यात घरगुती कामे पूर्ण करण्यासाठी खूप धावपळ करावी लागू शकते. या आठवड्यात रिलेशनमध्ये आकर्षण वाढू शकते, पण प्रेमसंबंधात विचारपूर्वकच पुढे जा; अन्यथा तुम्हाला नाहक अडचणींना सामोरे जावे लागू शकते. तुम्ही आधीच प्रेमसंबंधात असाल, तर एखाद्या गोष्टीवरून तुमच्या प्रेम जोडीदारासोबत वाद होऊ शकतो. कोणत्याही परिस्थितीत गैरसमज वाढू देऊ नका; अन्यथा तुमच्या नात्यात दुरावा येऊ शकतो. विवाहित लोकांना जोडीदाराच्या खराब आरोग्यामुळे काळजी वाटेल.लकी रंग: पिवळा
लकी नंबर: ५
वृषभ - आठवड्याच्या मध्यात घरगुती कामे पूर्ण करण्यासाठी खूप धावपळ करावी लागू शकते. या आठवड्यात रिलेशनमध्ये आकर्षण वाढू शकते, पण प्रेमसंबंधात विचारपूर्वकच पुढे जा; अन्यथा तुम्हाला नाहक अडचणींना सामोरे जावे लागू शकते. तुम्ही आधीच प्रेमसंबंधात असाल, तर एखाद्या गोष्टीवरून तुमच्या प्रेम जोडीदारासोबत वाद होऊ शकतो. कोणत्याही परिस्थितीत गैरसमज वाढू देऊ नका; अन्यथा तुमच्या नात्यात दुरावा येऊ शकतो. विवाहित लोकांना जोडीदाराच्या खराब आरोग्यामुळे काळजी वाटेल.लकी रंग: पिवळालकी नंबर: ५ 
advertisement
5/7
मिथुन रास: मिथुन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा कामात शुभ फळ देणारा आहे. आठवड्याची सुरुवात काही चांगल्या बातमीने होईल, ज्यामुळे घरात आनंदाचे वातावरण राहील. आठवड्याच्या सुरुवातीला घरी एखाद्या प्रिय व्यक्तीचे आगमन होऊ शकते. या काळात अचानक पिकनिक आणि पार्टीच्या संधी मिळतील. आठवड्याच्या मध्यात तुमचे भाग्याची साथ असेल असेल. एका प्रभावशाली व्यक्तीच्या मदतीने दीर्घकाळची समस्या सुटेल. आठवड्याच्या उत्तरार्धात तीर्थयात्रेला जाण्याची शक्यता आहे. या काळात लांबचा प्रवास तुमच्या व्यवसायाच्या वाढीचे कारण बनेल. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून तुम्हाला नफा मिळेल.

6/7
मिथुन राशीच्या लोकांसाठी उत्पन्नाचे नवीन मार्ग निर्माण होतील. पैशांचा ओघ वाढेल, पण खर्चही जास्त होईल. सुख-सुविधांच्या साधनांवर भरपूर खर्च कराल. संबंधांच्या दृष्टीने हा आठवडा तुमच्यासाठी अनुकूल असणार आहे. भावंडांसोबत एखाद्या गोष्टीवरून गैरसमज झाला असेल, तर या आठवड्यात संवाद साधून तो दूर होईल. कोणासोबतची नवीन मैत्री प्रेमसंबंधात बदलू शकते. जुन्या प्रेमसंबंधात परस्पर विश्वास वाढेल. वैवाहिक जीवन आनंदी राहील. तुमचा जीवनसाथी तुमच्या आनंदाची पूर्ण काळजी घेईल.लकी रंग: नारंगी
लकी नंबर: ३
मिथुन राशीच्या लोकांसाठी उत्पन्नाचे नवीन मार्ग निर्माण होतील. पैशांचा ओघ वाढेल, पण खर्चही जास्त होईल. सुख-सुविधांच्या साधनांवर भरपूर खर्च कराल. संबंधांच्या दृष्टीने हा आठवडा तुमच्यासाठी अनुकूल असणार आहे. भावंडांसोबत एखाद्या गोष्टीवरून गैरसमज झाला असेल, तर या आठवड्यात संवाद साधून तो दूर होईल. कोणासोबतची नवीन मैत्री प्रेमसंबंधात बदलू शकते. जुन्या प्रेमसंबंधात परस्पर विश्वास वाढेल. वैवाहिक जीवन आनंदी राहील. तुमचा जीवनसाथी तुमच्या आनंदाची पूर्ण काळजी घेईल.लकी रंग: नारंगीलकी नंबर: ३
advertisement
7/7
कर्क रास: कर्क राशीच्या लोकांसाठी हा आठवडा मिश्रीत असणार आहे. कामाच्या ठिकाणी काही अडचणी असूनही तुमचे वर्चस्व कायम राहील. अधिकारी तुमच्यावर पूर्णपणे मेहरबान असतील. मात्र, या काळात तुम्हाला तुमच्या गुप्त शत्रूंपासून पूर्णपणे सावध राहायचे आहे, कारण ते तुमच्या कामात अडथळे आणण्याचा किंवा तुमची प्रतिमा खराब करण्याचा कट रचू शकतात. व्यावसायिकांना आठवड्याच्या मध्यात व्यवसायात मंदीचा सामना करावा लागू शकतो. या काळात व्यवसायात संथ प्रगती आणि अपेक्षित नफा न मिळाल्याने तुमचा मानसिक ताण वाढू शकतो. कर्क राशीच्या लोकांना आठवड्याच्या उत्तरार्धात खूप खर्च होईल. या काळात तुम्हाला घराची दुरुस्ती किंवा इतर गरजा पूर्ण करण्यासाठी जास्त पैसे खर्च करावे लागतील. या आठवड्यात स्वतःसोबतच तुमच्या आईच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या. कर्क राशीचे लोक या आठवड्यात प्रेमसंबंधात मोठे पाऊल उचलू शकतात. विशेष म्हणजे तुमचा प्रेम जोडीदार प्रत्येक निर्णयात तुमच्यासोबत पूर्णपणे उभा राहील आणि तुमची ताकद बनेल. मात्र, भावनांच्या भरात वाहून कोणताही निर्णय घेणे टाळा. सुखी वैवाहिक जीवन जगण्यासाठी, तुमच्या व्यस्त वेळेतून जोडीदारासाठी थोडा वेळ काढा आणि त्यांच्या भावनांचा आदर करा.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement