भारतात लॉन्च झाली ही दमदार इलेक्ट्रिक SUV, सिंगल चार्जमध्ये चालते 635km पर्यंत; लूकही भारी
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
BMW iX xDrive50 भारतात लॉन्च करण्यात आली आहे. याची WLTP-सर्टिफाइड रेंज 635km आहे. चला जाणून घेऊया इतर डिटेल्सविषयी...
नवी दिल्ली : BMW ने भारतात iX चे नवीन हाय स्पेक व्हेरिएंट xDrive50 लॉन्च केलेय. याची एक्स-शोरुम किंत 1.40 कोटी रुपये ठेवण्यात आली आहे. या टॉप व्हेरिएंटमध्ये मोठी बॅटरी देण्यात आलीये. ज्यात जास्त रेंजही मिळेल. यासोबतच पॉवरफूल मोटर्सही देण्यात आलेय. iX xDrive40 च्या तुलनेत छोटे-मोठे बदल इंटीरियर आणि एक्सटीरियरमध्ये करण्यात आले आहेत. xDrive40 च्या तुलनेत xDrive50 19 लाख रुपये जास्त महाग आहे.
advertisement
नावावरुनच समजू शकतं की, iX xDrive50 में 111.5kWh बॅटरी पॅक देण्यात आलंय. याची WLTP-सर्टिफाइड रेंज 635km आहे. येथे प्रत्येक एक्सलवर दोन इलेक्ट्रिक मोटर देण्यात आलेय. जे ऑल व्हील ड्राइव्हच्या माध्यमातून कंबाइंड 523hp ची पॉवर आणि 765Nm चं पीक टॉर्क जनरेट करते. ही ऑल-इलेक्ट्रिक SUV केवळ 4.6 सेकेंड्समध्ये 100kph ची स्पीड पकडते.
advertisement
advertisement
advertisement