SUV: आता छोटी कार विकून टाका! दिवाळीला घरी आणा SUV, 1.60 लाखांची सूट; 11 एसयूव्हीची यादी
- Published by:Sachin S
Last Updated:
दिवाळीत आपल्या दारात दमदार अशी कार उभी राहावी असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. पण आता यंदाच्या दिवाळीला हे स्वप्न पूर्ण होऊ शकतं. केंद्र सरकारने जीएसटीच्या दरात कपात केली आहे. २८ टक्के स्लॅब हा रद्द केला आहे. त्यामुळे वाहनांच्या किंमतीत मोठी कपात झाली आहे. अशातच दिवाळीचा सण आला आहे, त्यामुळे वाहन उत्पादक कंपन्यांनी कार आणि एसयूव्हीवर ऑफरचा वर्षाव केला आहे. कारच्या किंमती तर कमी झाल्याच आहे, पण SUV च्या किंमतीही कमी झाल्या आहे. मार्केटमध्ये कोणत्या कारवर किती सूट आहे, याची यादी.
advertisement
Kia Syros - दक्षिण कोरियन कंपनी किआ मोटर्सने अलीकडे लाँच केली Kia Syros वर सगळ्याच जास्त डिस्काउंट सुरू आहे. या एसयूव्हीवर सर्वाधिक 1.6 लाखपर्यंतची सूट दिली आहे. या एसयूव्हीची किंमत 8.67 लाखांपासून सुरू होते. टॉप मॉडेल 15.94 लाख (एक्स-शोरूम) पर्यंत आहे. दिवाळी ऑफर अंतर्गत कंपनी या एसयूव्हीवर 1.6 लाख पर्यंतची सूट दिली आहे. ही एसयूव्ही HTK पासून HTX+(O) पर्यंत सहा ट्रिम्समध्ये (Trims) उपलब्ध आहे. या एसयूव्हीमध्ये 120hp टर्बो-पेट्रोल आणि 116hp डिझेल इंजिनचा पर्याय दिला गेला आहे.
advertisement
[caption id="attachment_1505085" align="alignnone" width="750"] Kia Sonet - किआ मोटर्सची सर्वाधिक विक्री होणार आणि मार्केटमध्ये क्रेटालाही टक्कर देणार किआ सोनेट आहे. या एसयूव्हीवर 1.03 लाख पर्यंत ऑफर दिली आहे. Kia Sonet ही एक बाजारात खूप लोकप्रिय एसयूव्ही आहे. Kia Sonet ची किंमत 7.30 लाखांपासून सुरू होते, टॉप मॉडेल 14.09 लाख (एक्स-शोरूम) च्या दरम्यान आहे. दिवाळीत कंपनी 1.03 लाख पर्यंतची सूट दिली आहे. Kia Sonet मध्ये टर्बो-पेट्रोल, डिझेल आणि 83hp नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिनचे पर्याय उपलब्ध आहेत. Sonet एकूण 9 व्हेरियंट्समध्ये उपलब्ध आहे.</dd>
<dd>[/caption]
advertisement
Nissan Magnite - जपानी कंपनी निसानची Magnite ही भारतात सगळ्यात स्वस्त आणि मस्त अशी एसयूव्ही आहे. या Magnite वर 89,000 रुपयांची सूट दिली आहे. Magnite किंमत 5.62 लाख (एक्स-शोरूम) आहे. कंपनी यावर 89,000 रुपयांपर्यंत सूट दिली आहे. एवढंच नाहीतर कॅश डिस्काउंट, एक्सचेंज बोनस आणि 1 ग्रॅम गोल्ड कॉईन ऑफरचा दिली आहे. Magnite मध्ये 72hp पेट्रोल आणि 100hp टर्बो-पेट्रोल इंजिनचे पर्याय दिला आहे.
advertisement
Maruti Suzuki Fronx – भारतातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकीची Maruti Suzuki Fronx ही मिड साईज क्रॉस एसयूव्ही आहे. Maruti Suzuki Fronx वर 88,000 पर्यंतची सूट दिली आहे. Maruti Suzuki Fronx ची किंमत 6.85 लाखांपासून सुरू होते ती 11.98 लाख (एक्स-शोरूम) च्या दरम्यान आहे. कंपनी Maruti Suzuki Fronx वर 88,000 पर्यंतची सूट दिली आहे. ही एसयूव्ही Sigma पासून Alpha पर्यंत पाच ट्रिम्समध्ये येते आणि पेट्रोल इंजिनसह उपलब्ध आहे.
advertisement
Renault Triber - ही सगळ्यात स्वस्त अशी ७ सीटर एमपीव्ही आहे. कंपनीने अलीकडे Renault Triber चं नवीन मॉडेल लाँच केलं आहे. Renault Triber वर 75,000 पर्यंत सूट दिली आहे. Renault Triber ची किंमत ही 5.76 लाख (एक्स-शोरूम) आहे आणि कंपनी यावर 75,000 पर्यंतची ऑफर दिली आहे. यात कॅश डिस्काउंट, एक्सचेंज बोनस आणि कॉर्पोरेट ऑफर्सचा समावेश आहे. Triber मध्ये 72hp चे पेट्रोल इंजिन दिलं आहे.
advertisement
Renault Kiger - रेनॉल्ट मोटर्सची आणखी एक स्वस्त आणि मस्त कार म्हणजे Renault Kiger आहे. ही छोटीशी कार सिंगल फॅमिलीसाठी बेस्ट आहे. Renault Kiger वर 70,000 पर्यंतची ऑफर दिली आहे. Kiger ची किंमत 5.76 लाख ते 10.34 लाख (एक्स-शोरूम) च्या दरम्यान आहे. यात 72hp नॅचरली एस्पिरेटेड आणि 100hp टर्बो-पेट्रोल इंजिनचा पर्याय आहे.
advertisement
Maruti Suzuki Jimny - मारुती सुझुकीची Maruti Suzuki Jimny ही थारला टक्कर देण्यासाठी मार्केटमध्ये आली होती. पण, Maruti Suzuki Jimny ने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. Maruti Suzuki Jimny वर कंपनीने 70,000 पर्यंतची सूट दिली आहे. ही एक ऑफ-रोडिंग एसयूव्ही आहे. Maruti Suzuki Jimny ची किंमत 12.32 लाखांपासून सुरू होते. टॉप मॉडेल 14.45 लाख (एक्स-शोरूम) च्या दरम्यान आहे. Maruti Suzuki Jimny मध्ये 1.5-लीटर पेट्रोल इंजिनमध्ये उपलब्ध आहे आणि Zeta आणि Alpha व्हेरियंट उपलब्ध आहे.
advertisement
Skoda Kylaq - जर्मन मोटर्स कंपनी Skoda ची Kylaq अलीकडे लाँच झाली. या गाडीमध्ये दमदार असे फिचर्स आहे. Skoda Kylaq वर 65,000 पर्यंतची सूट दिली आहे. Skoda Kylaq ची सुरुवातीची किंमत 7.55 लाख (एक्स-शोरूम) आहे. यात 1-लीटर टर्बो-पेट्रोल इंजिन दिलं आहे. Skoda Kylaq मध्ये Classic पासून Prestige पर्यंत ४ व्हेरियंट्समध्ये उपलब्ध आहे.
advertisement
Hyundai Venue - दक्षिण कोरियन कंपनी Hyundai ची Venue हे एक लोकप्रिय एसयूव्ही आहे. कंपनीने Hyundai Venue वर 50,000 रुपयांपर्यंत डिस्काउंट ऑफर दिली आहे. Hyundai Venue ची किंमत 7.26 लाख (एक्स-शोरूम) पासून सुरू होते. Venue मध्ये पेट्रोल, टर्बो-पेट्रोल आणि डिझेल इंजिनचे पर्याय दिला आहेत. यात N Line व्हर्जन देखील आहे.
advertisement
advertisement
Mahindra XUV 3XO - महिंद्रा मोटर्सची X700 ची कॉपी असलेली Mahindra XUV 3XO ही एक बजेट फ्रेंडली एसयूव्ही आहे. Mahindra XUV 3XO वर 45,000 45,000 पर्यंतची सूट दिली आहे. Mahindra XUV 3XO ची किंमत 7.28 लाख ते 14.40 लाख (एक्स-शोरूम) च्या दरम्यान आहे. Mahindra XUV 3XO मध्ये ३ इंजिन पर्याय ऑफर करते - 117hp डिझेल, 111hp 1.2 TCMPFi टर्बो-पेट्रोल आणि 131hp 1.2 TGDi टर्बो-पेट्रोल.