वेळ संपत आली! नंबरप्लेट बदलण्यासाठी फक्त ६ दिवस बाकी; अन्यथा थेट १०,००० रुपयांचा दंड

Last Updated:
HSRP नंबरप्लेटसाठी ३० नोव्हेंबर अंतिम तारीख आहे. उशीर झाल्यास १० हजार रुपये दंड लागू शकतो. फक्त ६ दिवस शिल्लक, त्वरित अर्ज करा आणि वाहन सुरक्षित ठेवा.
1/7
वाहनधारकांसाठी ही अत्यंत महत्त्वाची आणि तातडीची सूचना आहे! तुमच्या गाडीची नंबरप्लेट बदलण्याची अंतिम मुदत आता अगदी जवळ आली आहे. तुमच्या वाहनावर हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट नसेल, तर काळजी घ्या, कारण फक्त ६ दिवसांनंतर तुम्हाला थेट १० हजार रुपयांचा जबर दंड भरावा लागू शकतो.

advertisement
2/7
सरकारने या नियमाची अंमलबजावणी अत्यंत कडकपणे सुरू केली आहे. त्यामुळे, जर तुम्ही अजूनही ही नवीन नंबरप्लेट लावली नसेल, तर लगेच कारवाई करा. राज्यात 40 टक्केच वाहानांनी नवीन नंबरप्लेट बसवून घेतली आहे. जर तुम्ही नवीन नंबरप्लेटसाठी अर्ज केला नसेल तर तुमच्याकडे 6 दिवस शिल्लक राहिले आहेत.

3/7
याआधी सरकारने तीनवेळा मुदतवाढ दिली होती. 30 नोव्हेंबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. मुदतवाढ पुन्हा देणार की नाही याबाबत तूर्तास तरी कोणतीही अपडेट सरकारकडून आली नाही. त्यामुळे तुम्ही उशीर न करता तातडीनं नंबरप्लेट घेण्यासाठी प्रयत्न करा. जर मुदतवाढ मिळाली नाही तर 10 हजार रुपये दंड भरावा लागू शकतो.

4/7
HSRP म्हणजे वाहनांची सुरक्षितता आणि ओळख अधिक मजबूत करण्यासाठी सरकारने निश्चित केलेली नवीन मानक नंबरप्लेट. या प्लेटवर एक विशिष्ट होलोग्राम आणि सुरक्षा कोड असतो, ज्यामुळे वाहनांची चोरी किंवा गैरवापर झाल्यास ते ट्रॅक करणे सोपे होते. जुन्या पद्धतीच्या, अनधिकृत नंबरप्लेट वापरणे आता कायद्याचे उल्लंघन मानले जात आहे. त्यामुळे, तुमच्या दुचाकी, चारचाकी किंवा कोणत्याही वाहनावर HSRP नसेल तर तुमच्या अडचणी वाढू शकतात.

5/7
हा नियम हलक्यात घेऊ नका, कारण दंडाची रक्कम खूप मोठी आहे. अंतिम मुदतीनंतर जर कोणत्याही वाहनावर HSRP नसेल, तर वाहतूक पोलीस किंवा प्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO) थेट १० हजार रुपयांचे चालान फाडू शकते. जर तुम्ही अर्ज केला असेल मात्र नंबर प्लेट आली नसेल तर तुम्हाला 1 हजार रुपये दंड भरावा लागू शकतो. त्यामुळे दंडाची रक्कम टाळण्यासाठी आताच नंबरप्लेट बसवण्यासाठी धडपड करा.

6/7
ही नवीन नंबरप्लेट बदलण्याची प्रक्रिया आता ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने उपलब्ध आहे. वाहन मालकांनी अधिकृत डीलरशी किंवा संबंधित सरकारी पोर्टलवरून अर्ज करून ही सुरक्षित प्लेट बसवून घ्यावी. शेवटच्या क्षणी गर्दी होण्याची शक्यता असल्याने, तुमचा वेळ वाया जाईल. त्यामुळे, हातात असलेले हे ६दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत.

7/7
वेळेत अर्ज केल्यास दंड तर टळेलच, पण तुमच्या वाहनाची कायदेशीर सुरक्षितताही वाढेल. नागरिकांनी केलेला निष्काळजीपणा त्यांच्यासाठी मोठा आर्थिक फटका घेऊन येऊ शकतो. म्हणून, तुमच्या सुरक्षिततेसाठी आणि कायद्याचे पालन करण्यासाठी, तुम्ही त्वरित तुमच्या वाहनाची स्थिती तपासा आणि या ६ दिवसांच्या आत HSRP लावण्यासाठी पाऊल उचला.

Dharmendra News:  धर्मेंद्र यांनी ६० वर्षापूर्वी खरेदी केलेली कार, आजही ठेवलीय जपून,  हे खास गुपित!
धर्मेंद्र यांनी ६० वर्षापूर्वी खरेदी केलेली कार, आजही ठेवलीय जपून, हे खास गुपित
  • धर्मेंद्र यांनी ६० वर्षापूर्वी खरेदी केलेली कार, आजही ठेवलीय जपून, हे खास गुपित

View All
advertisement