6 फूट उंची, गोरा रंग आणि 'बॅड बॉय' इमेज, तरीही हिरो नाही तर विलन बनून राहिला अभिनेता, सुपरस्टारसोबत काम करुनही मागे राहिलं करिअर
- Published by:Devika Shinde
Last Updated:
बॉलिवूडमध्ये एक असा अभिनेता आला होता ज्याची पर्सनॅलिटी पाहून बड्या स्टार्सनाही घाम फुटायचा. पण यश डोक्यात असं काही गेलं आणि एका चुकीच्या सवयीमुळे या देखण्या अभिनेत्याचं करिअर विनाशाच्या उंबरठ्यावर पोहोचलं. हिंदी सिनेमाच्या चंदेरी दुनियेत दररोज हजारो तरुण डोळ्यांत हिरो बनण्याचं स्वप्न घेऊन येतात. पण प्रत्येकाची नशीब साथ देत नाही. 90 च्या दशकात एक असा अभिनेता इंडस्ट्रीत दाखल झाला, ज्याची शरीरयष्टी एखाद्या इंटरनॅशनल मॉडेलसारखी होती.
advertisement
6 फूट 3 इंच उंची, सुंदर डोळे आणि डॅशिंग पर्सनॅलिटीमुळे त्याला पाहताच क्षणी दिग्दर्शकांनी 'चॉकलेट हिरो' म्हणून कास्ट करायला सुरुवात केली. पण नशिबाचे फासे असे काही पलटले की, हिरो म्हणून आलेला हा कलाकार पडद्यावरचा सर्वात भीतीदायक 'व्हिलन' बनला. हा अभिनेता आपल्या अभिनयापेक्षा त्याच्या बेधडक स्वभावासाठी आणि वादांसाठी जास्त ओळखला गेला. बड्या सुपरस्टार्ससोबत स्क्रीन शेअर करूनही, ज्या उंचीवर त्याने असायला हवं होतं, तिथे तो पोहोचू शकला नाही. यामागचं सर्वात मोठं कारण होतं त्याचं यश पचवता न येणं आणि कामाप्रती दाखवलेली सुरुवातीची बेपर्वाई. हा अभिनेता 4 जानेवारी 2026 आपला 61 वा वाढदिवस साजरा करत आहे.
advertisement
आम्ही बोलत आहोत, बॉलिवूडचा 'बॅड बॉय' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आदित्य पंचोली (Aditya Pancholi) याच्याबद्दल. आदित्य पंचोलीने आपल्या करिअरची सुरुवात 'शहादत' या टीव्ही शोमधून केली होती. त्यानंतर 1986 मध्ये 'सस्ती दुल्हन महंगा दूल्हा' या चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं. पण खरी ओळख त्याला 90 च्या दशकातील 'सैलाब', 'साथी' आणि 'तहलका' सारख्या सिनेमांनी मिळवून दिली. आदित्य दिसायला जितका देखणा होता, तितकाच तो कामाबद्दल सुरुवातीला 'कॅज्युअल' होता.
advertisement
advertisement
90 च्या दशकात फिल्मी मॅगझिन्समध्ये सर्वात जास्त चर्चा आदित्य पंचोलीची असायची. पण दुर्दैवाने यातील बहुतांश बातम्या त्याच्या रागीट स्वभावाबद्दल किंवा वादांबद्दल असायच्या. त्याच्याबद्दल इतक्या नकारात्मक अफवा पसरल्या होत्या की त्याचा परिणाम थेट त्याच्या करिअरवर झाला. या समस्यांना तोंड देण्यासाठी त्याने त्यावेळी इतर काही स्टार्ससोबत मिळून एक कमिटीही स्थापन केली होती.
advertisement
आदित्य पंचोलीने आपल्या कारकिर्दीत शाहरुख खान, अक्षय कुमार, अमिताभ बच्चन, धर्मेंद्र आणि अमरीश पुरी यांसारख्या दिग्गज कलाकारांसोबत काम केलं. 'यस बॉस' मधील त्याची नकारात्मक भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. 'आतिश' मधील त्याचा अभिनय पाहून अनेकांना वाटलं होतं की तो सुपरस्टार बनेल, पण त्याच्या स्वभावामुळे तो फक्त 'ग्रे शेड्स' किंवा साईड रोल्सपुरताच मर्यादित राहिला.
advertisement








