KDMC Election: डोंबिवलीच्या प्रभाग 29 मध्ये भाजप वापरणार अंबरनाथ पॅटर्न, शिंदेसेनेला धडधड!
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
कल्याण डोंबिवली महापालिकेतील काही लक्षवेधी लढतींपैकी प्रभाग क्रमांक 29 मध्ये शिवसेना विरुद्ध भाजप उमेदवारांमध्ये निवडणूक होणार असल्याने याकडे सर्वांचे लक्ष असेल.
डोंबिवली : डोंबिवलीत सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचे काही उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. शिवसेना भाजपची युती असतानाही आता प्रभाग 29 मध्ये भाजप विरुद्ध शिवसेना अशी लढत होणार आहे. त्यामुळे युती धर्म पाळला न गेल्याची चर्चा होती. पण या प्रभागात मैत्रीपूर्वक लढत होणार आहे असे भाजप कल्याण जिल्हा अध्यक्ष नंदू परब यांनी सांगितले. तर या ठिकाणी शंभर टक्के अंबरनाथ पॅटर्न राबवला जाईल, असा थेट इशारा नंदू परब यांनी दिल्याचे बोलले जात आहे.
कल्याण-डोंबिवलीत निवडणुकीचे वातावरण आता चांगलेच तापू लागले आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेतील काही लक्षवेधी लढतींपैकी प्रभाग क्रमांक 29 मध्ये शिवसेना विरुद्ध भाजप उमेदवारांमध्ये निवडणूक होणार असल्याने याकडे सर्वांचे लक्ष असेल. विशेष म्हणजे युती झालेली असतानाही उमेदवार एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत.
दरम्यान रविवारी डोंबिवलीतील आयरे गावात भाजपचे माजी नगरसेवक आणि आताचे उमेदवार मंदार टावरे यांच्या निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन भाजप कल्याण जिल्हा अध्यक्ष नंदू परब यांच्या हस्ते झाले. यावेळी टावरे यांनी शक्ती प्रदर्शन करत शिवसेनेच्या उमेदवारांवर घराणेशाहीचा आरोप केला. तर भाजप जिल्हाध्यक्ष यांनी थेट पॅनलमध्ये अंबरनाथ पॅटन चालणार असे सांगितले.
advertisement
अंबरनाथ पॅटर्न काय होता?
शिवसेना शिंदे गटाचे अरविंद वाळेकर यांचे प्रस्थ असतानाही यावेळी भाजपने आपले उमेदवार उभे करून अंबरनाथ नगर परिषदेमध्ये शिंदेसेनेला दणका दिला. वाळेकर यांचा धक्कादायकरित्या पराभव झाला. अंबरनाथ महापालिकेत भाजपचे नगराध्यक्ष निवडून आले. इथे डोंबिवलीतही घराणेशाहीला चपराक देऊन प्रभाग 29 मध्ये भाजपचे कमळ चालवा, असे नंदू परब म्हणाले.
view commentsLocation :
Kalyan-Dombivli (Kalyan-Dombivali),Thane,Maharashtra
First Published :
Jan 04, 2026 10:07 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
KDMC Election: डोंबिवलीच्या प्रभाग 29 मध्ये भाजप वापरणार अंबरनाथ पॅटर्न, शिंदेसेनेला धडधड!










