पाकिस्तान बॉर्डरजवळ काहीतरी मोठं घडतेय, सीमेवर मोठी हालचाल सुरू; भारताच्या प्रोजेक्टकडे जगाचे लक्ष
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Pakistan Border: पाकिस्तान सीमेवर भारताकडून सुरू असलेल्या एका भव्य प्रकल्पामुळे परिसरात मोठी हालचाल पाहायला मिळत आहे. या प्रकल्पाच्या प्रचंड आकारमानामुळे आणि त्यामागील उद्देशामुळे भारताच्या ताकदीकडे आता संपूर्ण जगाचे लक्ष वेधले गेले आहे.
भारतामध्ये सध्या आकार घेत असलेले मेगा प्रोजेक्ट्स देशाला नव्या उंचीवर नेणारे ठरणार आहेत. जगातील सर्वात मोठा ऊर्जा पार्क, भव्य संग्रहालय आणि आशियातील सर्वात मोठा विमानतळ यांसारख्या महत्त्वाकांक्षी योजना केवळ पायाभूत सुविधा मजबूत करणाऱ्या नाहीत, तर भारताच्या भविष्यातील आर्थिक, औद्योगिक आणि सांस्कृतिक वाटचालीची दिशा ठरवणाऱ्या आहेत. ऊर्जा स्वावलंबन, मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती आणि आधुनिक इन्फ्रास्ट्रक्चरच्या जोरावर देश अधिक सक्षम बनवण्याचा हा प्रयत्न मानला जात आहे.
advertisement
पाकिस्तान सीमेलगत असलेल्या गुजरातच्या कच्छ भागात अदानी समूहाकडून उभारला जात असलेला Renewable ऊर्जा पार्क हा जगातील सर्वात मोठा ठरणार आहे. पॅरिस शहराच्या सुमारे पाच पट क्षेत्रफळावर पसरलेला हा प्रकल्प इतका भव्य आहे की तो अंतराळातूनही दिसू शकतो. या ऊर्जा पार्कची वीज उत्पादन क्षमता सुमारे 1.8 कोटी कुटुंबांची गरज भागवू शकते. भारताच्या ऊर्जा क्षेत्रासाठी हा एक ऐतिहासिक टप्पा मानला जात असून, यामुळे स्वच्छ आणि पर्यावरणपूरक ऊर्जेला मोठी चालना मिळणार आहे. दुर्गम भागांपर्यंत वीज पोहोचवणे आणि ग्रामीण-शहरी दरी कमी करणे, हे या प्रकल्पाचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
advertisement
ऊर्जेसोबतच सांस्कृतिक क्षेत्रातही भारत मोठी झेप घेत आहे. केंद्रीय संस्कृती मंत्रालयाकडून दिल्लीत सध्याच्या सेंट्रल व्हिस्टा परिसरात जगातील सर्वात मोठे संग्रहालय उभारले जात आहे. हे संग्रहालय भारताच्या सुमारे 5,000 वर्षांच्या इतिहासाची साक्ष देणारे ठरणार आहे. एकाच छताखाली 25 हजारांहून अधिक दुर्मिळ कलाकृती येथे मांडल्या जाणार असून, भारतीय कला, संस्कृती आणि परंपरेचे हे जागतिक केंद्र ठरेल. देश-विदेशातील पर्यटकांसाठी हे संग्रहालय भारताची समृद्ध वारसा परंपरा अनुभवण्याचे महत्त्वाचे ठिकाण ठरणार आहे.
advertisement
वाहतूक क्षेत्रातही देश मोठ्या बदलाच्या उंबरठ्यावर आहे. दिल्ली-NCR आणि पश्चिम उत्तर प्रदेशासाठी नोएडा इंटरनॅशनल एअरपोर्ट उभारला जात असून, त्याचा IATA कोड DXN आणि ICAO कोड VIND आहे. आशियातील सर्वात मोठ्या सहा धावपट्ट्यांचा हा विमानतळ भविष्यातील वाढती प्रवासी संख्या सहज हाताळू शकेल. या प्रकल्पामुळे आंतरराष्ट्रीय उड्डाणांवरील ताण कमी होईल आणि भारताची जागतिक कनेक्टिव्हिटी अधिक मजबूत होईल.
advertisement
औद्योगिक क्षेत्रातही भारत आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करत आहे. आतापर्यंत देशात प्रामुख्याने चिप डिझाइन किंवा असेंब्ली होत होती, मात्र आता ‘इंडिया सेमीकंडक्टर मिशन’अंतर्गत गुजरातमध्ये थेट चिप मॅन्युफॅक्चरिंग प्रकल्प उभारले जात आहेत. विदेशी कंपन्यांच्या सहभागातून होणाऱ्या या गुंतवणुकीमुळे भारत तंत्रज्ञान क्षेत्रातही जागतिक पातळीवर आपली ओळख मजबूत करण्याच्या दिशेने पुढे जात आहे.
advertisement
या सर्व मेगा प्रोजेक्ट्सचा परिणाम केवळ इमारती किंवा पायाभूत सुविधांपुरता मर्यादित राहणार नाही. बांधकामापासून ते प्रत्यक्ष संचालनापर्यंत लाखो रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची शक्यता आहे. मोठ्या प्रमाणावरील गुंतवणुकीमुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल आणि आसपासच्या भागांचा सर्वांगीण विकास वेगाने होईल.
advertisement
सुमारे चार लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून साकारले जाणारे हे सात प्रमुख मेगा प्रोजेक्ट्स भारताला केवळ आधुनिक सुविधा देणारे नाहीत, तर देशाला ऊर्जा क्षेत्रात स्वावलंबी बनवणे, सांस्कृतिक वारसा जतन करणे आणि वाहतूक व्यवस्था जागतिक दर्जाची करणे, हा त्यामागचा व्यापक उद्देश आहे. वेस्टर्न-ईस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोरसारख्या प्रकल्पांमुळे लॉजिस्टिक्स आणि उद्योग क्षेत्रालाही नवे बळ मिळणार आहे. या सर्व योजना पूर्ण झाल्यानंतर भारत अधिक आधुनिक, सक्षम आणि आत्मविश्वासपूर्ण स्वरूपात जगासमोर उभा राहील. ऊर्जा, वाहतूक आणि संस्कृतीच्या क्षेत्रातील हे बदल देशाच्या विकासाला नवी दिशा देतील आणि येणाऱ्या पिढ्यांसाठी मजबूत पाया घालून जातील.









