27 लाखांची Tesla कार भारतात 69 लाखांना का विकली जातेय? नेमकी दिसायला कशी? खास PHOTOS
- Published by:Sachin S
Last Updated:
ड्रायव्हरलेस फिचर्स, ५ स्टार सेफ्टी आणि दमदार फिचर्समुळे अमेरिकेत प्रसिद्ध असलेली टेस्ला कार अखेरीस भारतात लाँच झाली आहे.
ड्रायव्हरलेस फिचर्स, ५ स्टार सेफ्टी आणि दमदार फिचर्समुळे अमेरिकेत प्रसिद्ध असलेली टेस्ला कार अखेरीस भारतात लाँच झाली आहे. विशेष म्हणजे, देशाची आर्थिक राजधानी मुंबईत टेस्लाचं शोरूम उघडण्यात आलं आहे. आधीच भारतीय मार्केटमध्ये टाटा मोटर्स, महिंद्रा मोटर्सच्या ईव्ही गाड्यांनी मार्केटमध्ये आपलं स्थान भक्कम केलं आहे. पण, आता टेस्ला आता भारतीय कंपन्यांना आव्हान देणार आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
Tesla Model Y मध्ये 7 कलर ऑप्शन दिले आहे. ही कार 2 ट्रिममध्ये उपलब्ध आहे. यामध्ये 15.4 इंचाचा इन्फोटेनमेंट सिस्टम फ्रंटला दिलं आहे. याशिवाय रिअरमध्ये 8 इंचाचा स्क्रीन सुद्धा दिला आहे. तर दुसरीकडे सीट अॅडजेस्ट करता येतं. यामध्ये ड्युल जोन ऑटोमॅटिक क्लाइमेट कंट्रोल, 19 इंचाचे क्रॉस फ्लो व्हील्स, फिक्स ग्लास रूफ आणि पॉवर रिअर लिफ्टगेट दिले आहे. स्पेसचा विचार केला तर या कारमध्ये ५ जण आरामात बसू शकतात. सीट एकदम आरामदायक आहे. भारतीय रस्त्यानुसार डिझाइन केले आहे.
advertisement
भारतात टेस्ला इतकी महाग का? भारतात टेस्ला ही मुळात तयार झाली नाही. त्यामुळे टेस्ला Y बेसिक किंमत ही २७ लाखांहून अधिक आहे, पण भारतात आयात केल्यामुळे या कारवर तब्बल २१ लाखांचा तर इंपोर्ट ड्युटी आणि इतर कर लागला आहे. इंपोर्ट ड्युटी ही सर्वात जास्त आहे. एवढंच नाहीतर आणखी जीएसटी तर बाकी आहे. आयात केलेल्या वस्तूवर जवळपास ५ टक्क्यांपेक्षा IGST आणि सेस २२ टक्के लागू होतो. त्यामुळे २७ लाखांची टेस्ला भारतातच्या रस्त्यावर येईपर्यंत तब्बल 63,82,490 रुपये मोजावे लागणार आहे.