Maruti Wagon R आता विसरा, Toyota आणतेय दणकट कार, पेट्रोलमध्ये मायलेज 35 किमी, किंमत तर...
- Published by:Sachin S
Last Updated:
याच कारची सध्या भारतात चाचणी सुरू आहे. नवी दिल्लीतील एम्सजवळ toyota aqua hybrid ची चाचणी करताना कॅमेऱ्यात कैद झाली.
सध्या सगळी ईलेक्ट्रिक वाहनांचा बोलबाला आहे. प्रत्येक वाहन उत्पादक कंपनी ही ईलेक्ट्रिक कार किंवा दुचाकी लाँच करण्याची तयारी करत आहे. मात्र, दुसरीकडे जपानची आघाडीची कार उत्पादक कंपनी टोयोटा आता लवकरच भारतात एक दमदार अशी हायब्रिड कार लाँच करण्याची तयारी करत असल्याची माहिती समोर आले आहे. कारण, या कारची चाचणी भारतीय रस्त्यावर सुरू झाली आहे. या कारचं नाव toyota aqua hybrid असं आहे. ही एक हॅचबॅक हायब्रिड कार आहे. या कारचं खास फिचर्स म्हणजे, या कारचं मायलेज हे तब्बल 35 किमी असल्याचा दावा कंपनीने केला आहे.
advertisement
toyota aqua hybrid ही कार मुळात जपानच्या रस्त्यावर राज्य करत आहे. हॅचबॅक सेगमेंटमध्ये असल्यामुळे किंमत आणि मायलेजमध्ये तिथे सुझुकीलाही टक्कर देते. याच कारची सध्या भारतात चाचणी सुरू आहे. नवी दिल्लीतील एम्सजवळ toyota aqua hybrid ची चाचणी करताना कॅमेऱ्यात कैद झााली. त्यामुळे लवकरच ही कार भारतात लाँच होणार अशी दाट शक्यता आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
toyota aqua hybrid मध्ये जी बॅटरी दिली आहे त्यात बायपोलर निकेल-मेटल हायड्राइड युनिट असेल. जे मानक Ni-MH बॅटरीच्या तुलनेत जास्त आउटपुट देईल. ती आकाराने कॉम्पॅक्ट राहील आणि ग्राहकांना रूटेड ड्रायव्हिंगचा अनुभव देईल. हे मॉडेल जर भारतात लाँच झालं तर मारुती सुझुकी वॅगनॉरला टक्कर देईल. कारण, कंपनीने ही कार ३५.८ किमी लिटर इतक मायलेज देईल असा दावा केला आहे.
advertisement
किंमत किती? जपानमध्ये toyota aqua hybrid ही विक्रीसाठी उपलब्ध आहे. या कारचं बेस मॉडेल हे जपानी चलन 1,980,000 येन रुपये इतके आहे. भारतीय चलनामध्ये या कारची किंमत ही 1160003 इतकी होते. तर याच कारच टॉपचं मॉडेल हे जपानी चलन 2,598,000 येन इतकं आहे. जर भारतीय चलनात विचार केला तर १५ लाख रुपये या कारची किंमत होईल.