Triumph Thruxton 400: रॉयल एनफील्डचा पडेल विसर, Triumph ची आली स्वस्तात दमदार 400 CC Bike
- Published by:Sachin S
Last Updated:
आता रॉयल एनफील्डला टक्कर देण्यासाठी ट्रायम्फने आपली नवीन बाइक लाँच केली आहे. Triumph Thruxton 400 असं या बाइकचं नाव आहे.
भारतीय ऑटो मार्केटमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून रॉयल एनफील्डने एकहात्ती आपली सत्ता कायम राखली आहे. दमदार आणि दणकट इंजिन देऊन रॉयल एनफील्डने आपलं वर्चस्व कायम राखलं आहे. पण आता रॉयल एनफील्डला टक्कर देण्यासाठी ट्रायम्फने आपली नवीन बाइक लाँच केली आहे. Triumph Thruxton 400 असं या बाइकचं नाव आहे. ही बाइक भारतात २,७४,१३७ रुपये (एक्स-शोरूम, चेन्नई) या किमतीत लाँच करण्यात आली आहे. ही किंमत सगळ्यात कमी आहे. ४०० सीसी सेगमेंटमध्ये ही एकमेव बाइक ठरली आहे.
advertisement
रॉयल एनफील्ड कॉन्टिनेंटल जीटी ६५० (royal Enfield Continental GT 650) ही एकमेव कॅफे रेसर आहे जी तिची स्पर्धा मानली जाऊ शकते. ज्याची किंमत ३.२६ लाख ते ३.५२ लाख रुपये (एक्स-शोरूम) दरम्यान आहे. पण, दोन्ही मॉडेल्समध्ये किंमत आणि पॉवरमध्ये मोठा फरक आहे. थ्रक्सटन ४०० हे बजाज-ट्रायम्फ भागीदारी अंतर्गत सादर केलेले ५ वे उत्पादन आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement