जगातील पहिली CNG बाईक 10 हजारांच्या डाउन पेमेंटवर खरेदी करायचीये? पहा EMI किती येईल
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
World CNG Bike: तुम्हीही परवडणाऱ्या बाईकच्या शोधात असाल, तर बजाज फ्रीडम 125 तुमच्यासाठी योग्य ऑप्शन ठरू शकते. चला जाणून घेऊया या बाईकच्या EMIची माहिती.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
Bajaj Freedom 125 बाईकची फीचर्स : बाजा फ्रीडम बाईकमध्ये दमदार 125cc सीसी इंजिन आहे. जे उत्तम पॉवर तसेच जबरदस्त मायलेज देते. त्याची डिझाइन खूप आकर्षक आहे आणि ती तरुणांना तसेच कुटुंबाला लक्षात घेऊन डिझाइन केली गेली आहे. या बाईकमध्ये तुम्हाला डिजिटल डिस्प्ले, एलईडी लाईट्स आणि आरामदायी बसण्याची सुविधा यासारख्या अनेक उत्तम फीचर्स मिळतात. या आरामदायी बसण्याची सुविधा तुमच्यासाठी एक उत्तम ऑप्शन बनवते.
advertisement
बाइकचे मायलेज किती आहे? : ही बाईक परवडणाऱ्या किमतीत लाँच करण्यात आल्याने तिला खूप पसंती मिळत आहे. या बाईकबद्दल कंपनीचा दावा आहे की ही बाईक प्रति लिटर 60-65 किलोमीटर मायलेज देते, ज्यामुळे इंधन वापराच्या बाबतीत ती किफायतशीर ठरते. पेट्रोल मोडमध्ये ती 130 किलोमीटरची रेंज देते. कंपनीचा दावा आहे की ही दोन्ही इंधने एकत्रितपणे 330 किलोमीटरपर्यंत मायलेज देतात.