जिद्द महत्त्वाची! साताऱ्यातील मायलेकी सोबत झाल्या बारावी पास, दुर्गम भागात राहून मिळवलं यश
- Published by:News18 Marathi
- Reported by:Shubham Sharad Bodake
Last Updated:
सातारा जिल्ह्यातील मायलेकीने सोबतच बारावी पास होण्याची किमया साधली आहे. त्यामुळे त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होताना पाहायला मिळत आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. यामध्ये सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील देवाची शेंबडी या गावातील मायलेकीने सोबतच बारावी पास होण्याची किमया साधली आहे. त्यामुळे त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होताना पाहायला मिळत आहे.
advertisement
advertisement
सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील देवाची शेंबडी हे गाव तसं दुर्गम आणि डोंगराळ भागातील गाव म्हणून ओळखलं जातं. या गावात जाताना अनेक शक्कल लाडवावे लागतात. देवाची शेंबडी इथे बस सेवा सुरू नाही. त्यामुळे तब्बल सहा किलोमीटरचा प्रवास करत डोंगरातून, घनदाट झाडीतून, पाऊलवाट तुडवत पुष्पा या साताऱ्याला येतं असतं. सातारा येथील कला वाणिज्य महाविद्यालय इथे त्यांनी गतवर्षी अकरावीला प्रवेश घेतला. त्यानंतर यंदा त्यांनी बारावीची परीक्षा दिली.
advertisement
1995-96 साली पुष्पा यांची दहावी झाली. दहावी पास होताच वडील धोंडीराम शिंदकर यांनी पुष्पा यांचे भरत साळुंखे यांच्याशी लग्न लावून दिले. पुष्पा यांचे माहेर बामनोली तर सासर देवाची शेंबडी होते. दोन्ही बाजूची घरची परिस्थिती हालकीची होती. नवराही मोलमजुरीचे काम करायचा. दोघांचा संसार सुरू झाला दोघांचे पाच जण झाले. तीन मुले जन्माला आली. भरत साळुंखे हे मुलासोबत मुंबईमध्ये राहू लागले.
advertisement
संसार चालवण्यासाठी त्यांनी मलमजुरीची नोकरी सुरू केली. पगार अत्यंत कमी असल्याने आर्थिक परिस्थिती अजून देखील सुधारली नव्हती, त्यामुळे घर चालवण्यासाठी पुष्पा यांनी अंगणवाडी सेविकेसोबत मदतनीस म्हणून काम सुरू केले. हे करत असताना शिक्षण घेऊन पदवीधर झाले तर अंगणवाडी सेविका होऊ शकते ही महत्वाकांक्षा पुष्पा यांच्या मनात जागृत झाली आणि त्यांनी बारावीची परीक्षा दिली.
advertisement