पतीचं निधन, मुलांनीही सोडली साथ, पण मुलीनं दिला आधार, मेहनत पाहून आज सर्वजण करताय कौतुक!
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
असं म्हणतात की, जिद्द आणि मेहनत करण्याची तयारी असेल तर आयुष्यात व्यक्ती आपल्या आर्थिक अडचणींवर मात करू शकतो, हे एका मुलीने सिद्ध करुन दाखवले आहे. एक मुलगी आपली आई आणि बहिणीची परिस्थिती पाहू शकली नाही, त्यामुळे तिने स्वबळावर ई-रिक्शा चालवायला लागली. या पैशातून तिने आपल्या बहिणीचे लग्नही केले. आज ही मुलगी आपल्या आईसह स्वत:चेही पालनपोषण करत आहे. जाणून घेऊयात, ही अनोखी कहाणी. (सिमरनजीत सिंह/प्रतिनिधी)
advertisement
advertisement
advertisement
सुमनच्या वडिलांचे निधन झाले, त्यानंतर घराची आर्थिक परिस्थिती नाजूक झाली. सुमनचे तिन्ही भाऊ हे आईचा सांभाळ करत नव्हते. यामुळे तिने आपल्या पायावर उभे राहण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे तिने भाड्याची रिक्षा घेऊन चालवायला सुरुवात केली. काही दिवस ही रिक्षा चालवल्यावर तिने हप्त्यावर स्वत:ची ई-रिक्षा खरेदी केली. आता सुमन ही विद्यार्थ्यांना शाळेत ने-आण करण्याचे काम करते.
advertisement
सुरुवातीला हे काम करताना भिती वाटली. मात्र, आता हिम्मत वाढली आहे. कुणाची नोकरी करण्यापेक्षा आपले काम करणे कधीही चांगले, त्यामुळे अनेकांनी तिचे कौतुक केल्याचेही तिने सांगितले. सुमन सकाळी साडेपाच वाजता मुलांना शाळेत सोडते आणि त्यानंतर 7 वाजता घरी परत येते. मग साडेअकरा वाजेपासून प्रवासी वाहतूक करते. तसेच शाळेची मुलांची सुट्टी झाल्यावर दुपारी पुन्हा त्यांना घरी आणून सोडते.
advertisement