कमी फीमध्ये भरपूर कोर्स, येथून शिक्षण करुन विद्यार्थी कमावतेय लाखो रुपये, हे आहेत टॉप कॉलेज
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
DU Top Colleges: भारतातील प्रतिष्ठित विद्यापीठांमध्ये दिल्ली विद्यापीठाचे नाव आदराने घेतले जाते. या विद्यापीठात आपण शिक्षण घ्यावं, असं भारतातील बहुतांश विद्यार्थ्याचं स्वप्न असतं. जर तुम्हीही दिल्ली विद्यापीठात शिकण्याचा प्रयत्न करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. आज आम्ही तुम्हाला दिल्ली विद्यापीठातील टॉप कॉलेज कोणते आहेत, याबाबत जाणून घेऊयात. (अभिषेक तिवारी/दिल्ली, प्रतिनिधी)
दिल्लीतील ज्या कॉलेजेसला NIRF रँकिंग 2023 च्या यादीत सर्वात टॉप क्रमांक मिळाला, त्या महाविद्यालयांची माहिती आपण आज जाणून घेणार आहोत. दिल्ली विद्यापीठातील टॉप कॉलेजमध्ये मिरांडा हाऊस कॉलजेने पहिला क्रमांक मिळवला आहे. 2023 मध्ये याची रँकिंग ही 74.81 इतकी होती. हे कॉलेज महिलांसाठी एक प्रतिष्ठित संस्था आहे. येथून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनी आज विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करत आहेत.
advertisement
दिल्ली विद्यापीठाच्या हिंदू कॉलेज NIRF रँकिंग 2023 मध्ये 72.39 स्कोअरसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. या कॉलेजची स्थापना ही 1899 मध्ये करण्यात आली होती. सायन्स आणि आर्ट्ससाठी हे कॉलेज देशातील सर्वात जुने आणि प्रतिष्ठित असे कॉलेज आहे. येथील विद्यार्थी हे विविध महत्त्वाच्या पदावंर कार्यरत असून कॉलेजची प्रतिष्ठा, मान आणखी वाढवत आहेत.
advertisement
advertisement
श्री राम कॉलेज ऑफ कॉमर्स हे महाविद्यालय NIRF रँकिंग 2023 मध्ये 68.86 स्कोअरसह 11 व्या क्रमांकावर होते. या महाविद्यालयाची स्थापना ही 1926 मध्ये लाला श्री राम यांनी केली होती. हे कॉलेज कॉमर्स आणि अर्थशास्त्रासाठी देशातील प्रमुख शिक्षणसंस्था आहे. येथील विद्यार्थी व्यवसाय आणि वित्त क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करत आहेत.
advertisement
advertisement
advertisement