वडिलांचं निधन अन् स्वप्नांचा चुराडा! आता दुसऱ्याच्या यशासाठी झटतोय हा पुणेकर!
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Prachi Balu Kedari
Last Updated:
Inspiring Story: लहानपणी आईला सांगायचो मी कलेक्टर होईल परंतु परिस्थितीने साथ नाही दिली. आपण नाही झालो तरी आपलं स्वप्न त्यांच्यात बघू शकतो, असं गणेश पवार सांगतात.
advertisement
advertisement
advertisement
गणेश यांनी स्वत:चं शिक्षण देखील काम करतच पूर्ण केलं. पदवीपर्यंतचं शिक्षण झाल्यानंतर उत्पन्नाचं साधन म्हणून झेरॉक्स सेंटर सुरू केलं. त्यानंतर शिक्षण थांबलं. मात्र, स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मुलांकडं पाहिलं की भूतकाळ आठवत होता. समाजाचं काहीतरी आपणही देणं लागतो, म्हणून या मुलांना मदतीचा निर्णय घेतला.
advertisement
advertisement
लहानपणी आईला सांगायचो मी कलेक्टर होईल परंतु परिस्थितीने साथ नाही दिली. आपण नाही झालो तरी आपलं स्वप्न त्यांच्यात बघू शकतो. पुढे दोन अभ्यासिका सुरू केल्या. गरीब विद्यार्थी पूर्व परीक्षा पास झाल्यानंतर पुढे मेन्सची तयारी करतात. परस्थितीमुळं त्यांना आर्थिक अडचणी असतात त्यांना गणेश हे मोफत अभ्यासिका देतात.
advertisement
मी अगदी छोटंसं काम करतो. या मुलांना सगळ्यांची जाण असल्यामुळे ते कधीही विसरत नाहीत. 2002 पासून दुकान होतं. 2013 नंतर स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मुलांना मदत करायला सुरुवात केली. आज अनेक मुलांनी पोस्ट देखील मिळवल्या आहेत. त्यामुळे खरंच खूप छान वाटतं, अशा भावना गणेश पवार यांनी व्यक्त केल्या. (प्राची केदारी, प्रतिनिधी)