MP : भाजपच्या महिला मंत्रीच्या भावाला ड्रग केसमध्ये अटक; 45 किलो 'गांजा तस्करी' प्रकरणात तुरुंगात पाठवणी
- Published by:Devika Shinde
Last Updated:
एकाच कुटुंबातील दोन व्यक्ती ड्रग्ज तस्करीच्या आरोपांमुळे चर्चेत आल्याने, राजकीय प्रभाव, कायद्याचे दुर्लक्ष आणि अंमलबजावणीची पारदर्शकता यावर थेट प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
देशात अंमली पदार्थांच्या (Narcotics) तस्करीवर कारवाई करणाऱ्या पोलिसांच्या हाती मोठे यश लागले आहे, मात्र यामुळे सत्ताधारी पक्षाच्या वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. भाजपच्या राज्यमंत्री प्रतिमा बागडी यांचे बंधू अनिल बागडी यांना गांजा तस्करीच्या (Marijuana Smuggling) गंभीर आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.
advertisement
या घटनेने अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत, कारण काही दिवसांपूर्वीच याच मंत्र्यांच्या मेहुण्याला (Brother-in-law) नार्कोटिक्स प्रकरणात अटक झाली होती. एकाच कुटुंबातील दोन व्यक्ती ड्रग्ज तस्करीच्या आरोपांमुळे चर्चेत आल्याने, राजकीय प्रभाव, कायद्याचे दुर्लक्ष आणि अंमलबजावणीची पारदर्शकता यावर थेट प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
advertisement
नेमके काय घडले आणि माल कुठे लपवला होता?सतना पोलिसांनी ड्रग्ज तस्करीवर केलेल्या मोठ्या कारवाईत अनिल बागडी आणि त्यांचा साथीदार पंकज सिंग यांना अटक केली आहे.पोलिसांनी अनिल बागडी आणि पंकज सिंग यांच्याकडून तब्बल 46 किलो गांजा जप्त केला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात या जप्त केलेल्या गांजाची किंमत सुमारे 9.22 लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.
advertisement
माहितीनुसार मारौन्हा गावात पंकज सिंग यांच्या निवासस्थानी धाड टाकण्यात आली होती. तिथे हा गांजा अत्यंत चलाखीने भाताच्या (Paddy) पोत्यांमध्ये लपवून ठेवला होता. पंकजने पोलिसांना चौकशीत सांगितले की, गांजाचा हा साठा अनिल बागडी आणि आणखी एक आरोपी शैलेंद्र सिंग राजावत (जो सध्या फरार आहे) यांनी त्याला दिला होता.
advertisement
advertisement
advertisement
शैलेंद्र सिंग यापूर्वी 5.5 कोटी रुपयांच्या नार्कोटिक कफ सिरप तस्करी प्रकरणात सतना येथे अटक झाला होता आणि सध्या तो बांदा कारागृहात दुसऱ्या एनडीपीएस (NDPS) प्रकरणात आहे. आता मंत्र्यांचे बंधू आणि भावोजी असे दोघेही नार्कोटिक्स प्रकरणात सापडल्यामुळे विरोधकांनी सत्ताधारी पक्षावर थेट निशाणा साधला आहे.
advertisement
advertisement
संतापलेल्या स्वरात त्यांनी पत्रकारांना विचारले, "जबरदस्ती की बात क्यों करते हो तुम लोग?" (तुम्ही लोक उगाचच चर्चा का करता?) हा व्हिडीओ लगेचच सोशल मीडियावर व्हायरल झाला, ज्यामुळे त्यांच्यावर तीव्र टीका सुरू झाली आहे.काँग्रेस पक्षाने हा व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर पोस्ट करत सत्ताधारी पक्षावर टीका केली: "तस्करीच्या आरोपाखाली भावाला अटक केल्यावर मंत्री साहेबांचा संताप पाहा. भाजप सरकारच्या मंत्र्यांचे नातेवाईक आता उघडपणे तस्करी करताना पकडले जात आहेत. मुख्यमंत्री महोदय, तुमच्या गृह मंत्र्याला विचारा, राज्याला गुन्हेगारीच्या दलदलीत किती खोलवर ढकलणार?"
advertisement







