ब्लॅक मॅजिकची शिकार झाली 'विवाह' फेम अभिनेत्री, हातातून गेल्या 3 फिल्म्स, सांगितलं काय घडलं?
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Amrita Rao on Back Magic : बॉलिवूडमध्ये काळी जादू म्हणजेच ब्लॅक मॅजिक केलं जातं असं म्हणतात. यात किती सत्यता आहे हे कधीच समोर आलेलं नाही. पण अनेक कलाकार याविषयी बोलले आहेत.
'विवाह' सिनेमातून प्रेक्षकांच्या मनात घर करणारी प्रसिद्ध अभिनेत्री अमृता रावला देखील असाच अनुभव आला. नुकत्याच एका मुलाखतीत बोलताना अमृताने तिचा अनुभव शेअर केला.
advertisement
रणवीर अलाहाबादियाच्या पॉडकास्टवर अमृताने तिच्या आयुष्यातील काही खास अनुभव सांगितले. बॉलिवूडमध्ये तुला कधी काळ्या जादूचा अनुभव आला आहे का असा प्रश्न तिला विचारला असताा ती आश्चर्यचकीत झाली. त्यावर रणवीर तिला म्हणाला, "ज्यांचं मन शुद्ध असतं त्यांच्यावर अशा नकारात्मक शक्तींचा कोणताही परिणाम होत नाही."
advertisement
अमृतानं सांगितलं, "मी एकदा माझ्या गुरुजींना भेटलो होते तेव्हा त्यांनी मला आशीर्वाद दिला. पण नंतर त्यांनी माझ्या आईला सांगितलं की, माझ्यावर कोणीतरी काळी जादू केली आहे."
advertisement
"आईने मला हे सांगितलं तेव्हा मला मोठा धक्का बसला. कारण माझा या सगळ्या गोष्टींवर कधीच विश्वास नव्हता."
advertisement
अमृता पुढे म्हणाली, "आमचे गुरुजी अतिशय प्रामाणिक आहेत. त्यांना ना प्रसिद्धी हवी आहे ना पैसा. त्यांनी फक्त मला सत्य सांगितलं. त्यांच्या बोलण्यामुळे मला वाटलं की कदाचित माझ्या आयुष्यात काहीतरी असं घडत आहे."
advertisement
या काळात अमृताने तीन मोठे सिनेमा साइन केले होते. तिनही सिनेमे मोठ्या बॅनरचे होते. पण असं काही घडलं की ते तिन्ही सिनेमे बनलेच नाहीत.
advertisement
अमृताने सांगितलं, "मी त्या तिन्ही सिनेमांची सायनिंग अमाऊंट घेतली होती. पण ते सगळे प्रोजेक्ट बंद पडले आणि मला त्यांचे पैसे परत करावे लागले."
advertisement