मराठीत सुपरस्टार पण हिंदीत का मिळायचे फक्त नोकराचेच रोल! अशोक मामांनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Ashok Saraf : पद्मश्री अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे हे मराठीतील सुपरस्टार नट. पण हिंदी सिनेसृष्टीत काम करताना त्यांच्या वाट्याला फक्त नोकराचेच रोल आले. असं का? यामागचं कारण अशोक सराफ स्वत: सांगितलंय.
advertisement
advertisement
advertisement
अमुक तमुक या युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत अशोक सराफ यांनी सांगितलं "मराठी लोकांची इमेज ही हिंदीत बसत नाही. त्यांच्या दृष्टीने हिरो म्हणजे गोरा पान...तो काम काय करतो हे कोणाला माहीत नसतं. आणि कोणाला कळतंही नाही. तसे तर आपण दिसत नाही. त्यामुळे आपल्याला हिरोचे रोल कधी मिळणार नाही. मग आपण कॅरेक्टर शोधतो."
advertisement
अशोक सराफ पुढे म्हणाले, "माझ्यासारख्या किंवा लक्ष्मीकांत सारख्या चेहऱ्याला मग नोकराची भूमिका मिळते. त्याशिवाय काही मिळतच नाही. आता ते करायचं की नाही हे तुम्ही ठरवायचं असतं. जर तुम्हाला ते चांगले पैसे देत असतील, जर तुमचा फायदा होत असेल तर काहीच हरकत नाही. पण लोक काय म्हणतात यात अर्थ नाही. तिथे आम्ही हिरो म्हणून काम करणं हे होऊच शकत नाही. मग आम्ही कशाला हट्ट धरायचा."
advertisement
advertisement
त्यांनी भोजपूरी सिनेमाचा किस्सा सांगितला, ते म्हणाला, "एक भोजपुरी प्रोड्युसर आला होता. मी कधी भोजपुरी केलेलं नाही. एक भूमिका होती. मी त्याला म्हटलं माझ्याकडे वेळ नाही. या 15 दिवसांत होत असेल तर बघ. तो म्हणाला हो चालेल. मी परफेक्ट त्यांची भाषा बोललोय. त्यांचा लेहेजा पकडला की तुम्ही भोजपुरी बोलू शकता. मला भोजपुरीचं त्या वर्षीच बेस्ट अॅक्टर अवॉर्ड मिळालं. माझी जी भाषाच नाही त्या भाषेत मला अवॉर्ड मिळालं."
advertisement
advertisement