Finger Bowl : रेस्टॉरंटमध्ये जेवणानंतर लिंबू पाण्याचा बाऊल येतं, त्यात तुम्ही थेट हात धूता? मग तुम्ही चुकीचं करताय, 'ही' आहे योग्य पद्धत
- Published by:Devika Shinde
Last Updated:
अनेकांना हे पाहून प्रश्न पडतो की हे पाणी प्यायचं आहे का? की याचा काही वेगळा उपयोग आहे? प्रत्यक्षात हे फिंगर बाउल म्हणून ओळखलं जातं आणि त्याचा उद्देश हात धुण्यासाठी असतो.
मुंबई : तुम्ही काही रेस्टॉरंटमध्ये हे नोटीस केलं असेल की तिथे जेवण संपताच टेबलावर एक छोटंसं बाऊल येतं, ज्यामध्ये हलकं गरम पाणी असतं आणि त्यात तरंगणारा लिंबाचा तुकडा असतो. अनेकांना हे पाहून प्रश्न पडतो की हे पाणी प्यायचं आहे का? की याचा काही वेगळा उपयोग आहे? प्रत्यक्षात हे फिंगर बाउल म्हणून ओळखलं जातं आणि त्याचा उद्देश हात धुण्यासाठी असतो.
फिंगर बाउल म्हणजे काय?
फिंगर बाउल म्हणजे अर्धवट गरम पाण्याने भरलेली एक छोटं वाटी, ज्यामध्ये लिंबाचा एक तुकडा टाकलेला असतो. हे विशेषतः मोठ्या हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्समध्ये जेवणानंतर दिलं जातं. याचा मुख्य हेतू म्हणजे बोटांवर लागलेलं तेलकटपणं आणि अन्नाचे अवशेष स्वच्छ करणे.
योग्य वापर कसा करावा?
फिंगर बाउलमध्ये अनेक लोक थेट हात बुडवतात. पण ही खरंतर चुकीची पद्धत आहे. या बाऊलमध्ये बोटांच्या टोकांना हलकेच बुडवावे.स बोटं पाण्यात हलक्या हाताने फिरवून अन्नाचे उरलेले कण काढून टाकावेत. त्यानंतर टेबलावर ठेवलेल्या नॅपकिनने बोटं कोरडी करावी.
advertisement
काही लोक याचील लिंबाचा तुकडा त्या पाण्यात पिळतात आणि मग हात धूतात. खरंतर ही पद्धत देखील चुकीची आहे. लिंबाचा तुकडा ना पिळायचा असतो ना खायचा असतो.
याचा फायदा काय?
फिंगर बाउलचा योग्य वापर केल्याने हात स्वच्छ राहतात, तेलकटपणा निघून जातो आणि इतरांसमोर स्वच्छतेची चांगली छाप पडते.
अनेकदा माहितीअभावी लोक हे पाणी पिण्याची चूक करतात, पण पुढच्या वेळी जेवणानंतर टेबलावर असं हलकं गरम लिंबूवालं पाणी आलं तर त्याचा योग्य वापर करा आणि लोकांसमोर स्मार्ट बना.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 07, 2025 8:01 AM IST
मराठी बातम्या/Viral/
Finger Bowl : रेस्टॉरंटमध्ये जेवणानंतर लिंबू पाण्याचा बाऊल येतं, त्यात तुम्ही थेट हात धूता? मग तुम्ही चुकीचं करताय, 'ही' आहे योग्य पद्धत