प्रणित मोरे ठरणार गेम चेंजर, होणार Bigg Boss चा विजेता? यामुळे रंगल्यात चर्चा
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Pranit More In Bigg Boss 19 : 'बिग बॉस 19' सध्या सर्वत्र गाजत आहे. या कार्यक्रमातील मराठमोळा स्पर्धक प्रणित मोरे प्रणित मोरेची महाराष्ट्रभर चर्चा आहे. जवळजवळ प्रत्येकवेळी नॉमिनेट होऊनही प्रेक्षक त्याला वाचवत आहेत.
'बिग बॉस 19'मधील मराठमोळा स्पर्धक प्रसिद्ध स्टँड-अप कॉमेडियन प्रणित मोरे अत्यंत शांततेत, प्रचंड हुशारीने यंदाचा सीझन गाजवत आहे. तान्या मित्तल, अमाल मलिक आणि फरहाना भट्ट यांसारख्या जोरदार आवाजात बोलणाऱ्या स्पर्धकांच्या गर्दीत प्रणितने आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. प्रेक्षकांसाठी प्रणित मोरे हा फक्त आता कॉमेडियन राहिला नसून 'डार्क हॉर्स' आहे. डार्क हॉर्स म्हणजे असा खेळाडू ज्याला कोणी गांभीर्याने घेत नाही, पण तो सर्वांना मागे टाकून पुढे निघून जातो. प्रणित मोरेही बिग बॉसचा असाच एक ‘डार्क हॉर्स’ आहे. प्रणित मोरे खऱ्या अर्थाने 'बिग बॉस 19'चा गेम चेंजर आहे.
advertisement
प्रणित मोरे 'बिग बॉस 19'चा गेम चेंजर असण्याची प्रमुख चार कारणे आहेत. पहिलं कारण म्हणजे योग्य वेळ साधून चौकार मारण्याची सवय. प्रणित मोरेच्या ‘डार्क हॉर्स’ प्रतिमेला त्याच्या ‘एविक्शन पॉवर’मुळे एक वेगळं रुप आलं आहे. 'वीकेंड का वार'मध्ये सलमान खानने प्रणितला एक खास पावर दिली होती. त्याला अभिषेक बजाज, अशनूर कौर आणि नीलम गिरी यांपैकी कोणाला तरी वाचवायचे होते. सगळ्यांना खात्री होती की प्रणित आपल्या मित्राला, म्हणजेच अभिषेक बजाजलाच वाचवणार. पण प्रणितने सर्वांना धक्का देत अभिषेकला न वाचवता अशनूर कौरला वाचवले. त्यामुळे अभिषेक आणि नीलम दोघेही घराबाहेर गेले. खेळाच्या दृष्टीने अभिषेक हा पहिल्यापासून सर्वात दमदार स्पर्धक मानला जात होता. प्रणितने हुशारीने त्याच्या सर्वात मोठ्या स्पर्धकाला बाहेरचा रस्ता दाखवला. आपल्या एका निर्णयाने त्याने टॉप 6मधील स्वत:ची जागा जवळजवळ निश्चित केली. प्रणित एक चांगला खेळाडू तर आहेच, पण एक चांगला माणूसही आहे.
advertisement
प्रणित मोरे विजयी होण्याची दुसरी शक्यता म्हणजे स्वतःच्या टॅलेंटचा योग्य वापर. प्रणितची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्याची स्टँड-अप कॉमेडी आणि शांत स्वभाव. घरात फरहाना, तान्या आणि अमाल सतत ओरडत असताना प्रणित शांतपणे सगळं पाहतो आणि योग्य वेळी त्याचा ‘कॉमेडी बॉम्ब’ टाकतो. ‘द प्रणित मोरे शो’ घरातील सर्वात लोकप्रिय सेगमेंट बनला आहे. या शोमध्ये तो घरच्यांचा रोस्ट करतो, पण इतक्या हुशारीने आणि विनोदी अंदाजात की कुणालाच वाईट वाटत नाही. शोमध्ये 15 मिनिटांचा स्क्रीनटाईम मिळणे ही कलाकारासाठी मोठी गोष्ट आहे. पूर्वी हे सेगमेंट शेखर सुमन आणि रवि किशन सारखे कलाकार होस्ट करत होते. पण आता तेच काम स्पर्धक असूनही प्रणित करत आहे. त्याच्या वन-लाइनर्स आणि टायमिंगमुळे त्याचा फॅन बेस झपाट्याने वाढतो आहे.
advertisement
प्रणित मोरे 'बिग बॉस 19'चा विजेता होण्याचं तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे कॉमन मॅनसारखा लोकांशी कनेक्ट. प्रणितचा प्रवास खास आहे कारण त्याने स्वतःच्या कमतरतांना ताकद बनवले आहे. तो घरात कुठल्या मोठ्या सेलिब्रिटीसारखा राहत नाही, ना महागडी कपडे घालतो. त्याची साधी, आपली वाटणारी पर्सनॅलिटी प्रेक्षकांना आपल्यासारखीच वाटते. नुकतंच त्याने अशनूरशी बोलताना सांगितले की लहानपणी त्याचा सावळा रंग आणि इंग्रजी नीट न बोलता येण्यामुळे त्याची चेष्टा केली जात असे. त्याला नेहमी कमी समजले जात असे.
advertisement
प्रणित मोरे 'बिग बॉस 19'मधील एक शांत पण घातक खेळाडू आहे. डेंग्युमुळे घराबाहेर जाऊन परत येणे, त्याआधी कॅप्टन्सी जिंकणे आणि आपल्या सर्वात मोठ्या स्पर्धकाला बाहेरचा रस्ता दाखवणे. ही अगदी ‘डार्क हॉर्स’चीच लक्षणे आहेत. घरात बाकी सगळे ओरडून आणि भांडून लाइमलाइट मिळवत असताना प्रणित शांत डोक्याने घेतलेल्या निर्णयांनी खेळाची दिशा बदलत आहे.
advertisement
advertisement


