बॉलिवूडचे 10 ऐतिहासिक चित्रपट, प्रत्येक चित्रपट ठरला ब्लॉकबस्टर; निर्माते मोजत राहिले नोटा
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Bollywood Movies That Defined an Era : बॉलीवूडच्या काही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर विक्रमी यश मिळवले नाही, तर संपूर्ण काळालाच नव्याने परिभाषित केलं. प्रत्येक युगात असे काही चित्रपट होते, जे केवळ सुपरहिट झाले नाहीत, तर फॅशन, डायलॉग्स, संगीत आणि सामाजिक मूल्यांनाही नवा आयाम देऊन गेले. ‘मदर इंडिया’, ‘शोले’पासून ते ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’पर्यंत असे अनेक चित्रपट आहेत ज्यांनी केवळ रेकॉर्ड ब्रेक केले नाहीत तर प्रेक्षकांच्या हृदयातही अढळ स्थान मिळवलं.
1. मदर इंडिया (1957) : स्वातंत्र्य भारताचे प्रतीक मानला जाणारा 'मदर इंडिया' हा चित्रपट भारतीय मातृत्व आणि बलिदानाचा चेहरा बनला. गरीबी आणि सत्ताधारी जमिनदारी व्यवस्थेवर प्रखर प्रकाश टाकणाऱ्या या चित्रपटाला ऑस्कर नामांकन मिळाले होते. नरगिस यांच्या 'आई'च्या भूमिकेने ग्रामीण भारताच्या संघर्षाला अजरामर केलं. आजही या चित्रपटाची कथा आणि गाणी आठवली जातात. आयएमडीबीवर या चित्रपटाला 7.8 रेटिंग मिळाले आहे.
advertisement
2. शोले (1975) : 70 च्या दशकात अमिताभ बच्चन यांचा 'अँग्री यंग मॅन'चा अवतार समोर आला, ज्याने समाजातील अन्यायाविरोधात आवाज उठवणाऱ्या नायकाला केंद्रस्थानी आणले. 'शोले'ने मसाला चित्रपटांचा नवा अध्याय सुरू केला. अ‍ॅक्शन, ड्रामा आणि मैत्री यांचे उत्कृष्ट मिश्रण. गब्बर सिंह आणि त्याचे "कितने आदमी थे?" सारखे डायलॉग्स आजही लोकांच्या ओठांवर आहेत.
advertisement
3. उमराव जान (1981) रेखा यांच्या अभिनयाने सजलेला, मुझफ्फर अली दिग्दर्शित 'उमराव जान' हा चित्रपट तवायफी संस्कृती, लखनऊची गंगा-जमुनी तहजीब, उर्दू शायरी आणि मुजऱ्यांची नजाकत घेऊन आला.'दिल चीज क्या है' सारख्या गाण्यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केलं. 80 च्या दशकात व्यावसायिक आणि समांतर सिनेमाच्या मधला पूल उभा करणारा हा सिनेमा ठरला.
advertisement
4. कयामत से कयामत तक (1988) : 'कयामत से कयामत तक' या चित्रपटाने नव्या रोमँटिक सिनेमाची सुरुवात केली. मन्सूर खान यांच्या दिग्दर्शनात बनलेला हा चित्रपट तरुण प्रेम आणि कौटुंबिक विरोध यांची समांतर कथा सांगतो. आमिर खान आणि जूही चावला यांची जोडी ताजेपणाने भरलेली होती. 'पापा कहते हैं', 'ऐ मेरे हमसफर' यांसारखी गाणी सुपरहिट ठरली.
advertisement
advertisement
6. दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे (1995) : बॉलीवूडच्या रोमॅन्सचे स्वरूप बदलणारा 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' हा चित्रपट. आदित्य चोप्रा दिग्दर्शित, शाहरुख खान आणि काजोल यांची जबरदस्त केमिस्ट्री. आधुनिक प्रेम आणि पारंपरिक कौटुंबिक मूल्यांमधला सुवर्णमध्य साधणारा हा चित्रपट केवळ भारतात नव्हे, तर परदेशातही लोकप्रिय ठरला. DDLJ ही फक्त फिल्म नसून, एक भावना बनली.
advertisement
7. सत्या (1998) : राम गोपाल वर्मा दिग्दर्शित 'सत्या'ने क्राइम-थ्रिलर चित्रपटांना नवसंजीवनी दिली. मुंबई अंडरवर्ल्डचे वास्तव, भीकू म्हात्रे (मनोज बाजपेयी) आणि सत्या (J.D. चक्रवर्ती) यांसारखे पात्र आजही लोकांच्या लक्षात आहेत. अनुराग कश्यप आणि सौरभ शुक्ला यांच्या स्क्रिप्टने सखोल प्रभाव टाकला. 'सपने में मिलती है' सारखी गाणी लोकप्रिय झाली.
advertisement
लगान / कभी खुशी कभी गम / दिल चाहता है (2001) : 2001 साली आलेले हे तीन चित्रपट विविध बाजूंनी महत्वाचे ठरले. या तीन चित्रपटांनी 2000च्या दशकात बॉलीवूडचा चेहरामोहरा बदलला. 'लगान' ऐतिहासिक पार्श्वभूमीवर आधारित खेळ आणि संघर्षाचे प्रतीक दाखवणारा होता. 'कभी खुशी कभी गम' कौटुंबिक भावना आणि नात्यांचे उत्कट चित्रण दाखवणारा होता.'दिल चाहता है'मध्ये मॉडर्न दोस्ती, आलिशान लाइफस्टाइल आणि प्रेमाची नवी परिभाषा दाखवली होती.
advertisement
गली बॉय (2019) : रणवीर सिंह आणि आलिया भट्ट यांच्या दमदार अभिनयाने सजलेला 'गली बॉय' हा चित्रपट भारतात रॅप आणि हिप-हॉप संस्कृती मुख्य प्रवाहात आणणारा ठरला. जोया अख्तर दिग्दर्शित, 'अपना टाइम आएगा' सारखा डायलॉग एक घोषवाक्य बनला. ही गोष्ट आहे झोपडपट्टीतून बाहेर पडून मोठे स्वप्न पाहणाऱ्या युवकांची, ज्यांनी स्वतःची ओळख घडवली.