जयशी घटस्फोट, अन् आठवडाभरातच माहीच्या आयुष्यात नव्या व्यक्तीची एन्ट्री? लेकीच्या पोस्टने फोडलं बिंग
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Jay Bhanushali-Mahhi Vij Divorce: गेल्याच आठवड्यात या दोघांनीही अधिकृतपणे घटस्फोटाची घोषणा करून सर्वांना मोठा धक्का दिला. पण या धक्क्यातून चाहते सावरत नाहीत, तोच आता माहीच्या आयुष्यात एका नव्या व्यक्तीची एन्ट्री झाली आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
खरी चर्चा सुरू झाली ती तारा भानुशालीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर झालेल्या फोटोंमुळे. ताराच्या पेजवरून काही फोटो पोस्ट करण्यात आले आहेत, ज्यात नदीमने ताराला प्रेमाने कडेवर घेतलं आहे. या फोटोचं कॅप्शन काळजाचा ठोका चुकवणारं आहे. त्यात लिहिलंय, "हॅपी बर्थडे अब्बा! मी तुमच्यावर खूप खूप खूप प्रेम करते... तुमची तारा."
advertisement
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, नदीम हा माही विजच्या कुटुंबाचा अत्यंत जुना आणि जवळचा मित्र आहे. जय आणि माही एकत्र असतानाही नदीमचा त्यांच्या घरात वावर होता. इतकंच नाही, तर गेल्या वर्षी 'फादर्स डे'च्या निमित्तानेही ताराने नदीमसाठी एक इमोशनल पोस्ट शेअर केली होती. माहीच्या कठीण काळात नदीम तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला आहे. पण ताराने त्याला 'अब्बा' म्हणणं मात्र अनेकांना खटकत आहे.
advertisement










