advertisement

'आम्हाला आमचा वाटा द्याच!' Dhurandhar 2 चं कलेक्शन पाहून फिरले पाकिस्तानचे डोळे, ल्यारीच्या डागडुजीसाठी मागितले पैसे

Last Updated:
Dhurandhar 2 Collection: भारताचा शेजारी आणि कट्टर शत्रू पाकिस्तानला 'धुरंधर'ला मिळणारं यश बघवत नाही आहे. कराचीच्या ल्यारी भागातील नागरिकांची फिल्मच्या कमाईवर नजर असून त्यांनी आता यावर आपला हक्क सांगायला सुरुवात केली आहे.
1/9
भारतात सध्या धुरंधर २ चा डंका वाजतोय. या फिल्मने कमाईचे सर्व रेकॉर्ड मोडले. अवघ्या सहा दिवसांत या फिल्मने ९०० कोटींची कमाई केली असून रिलीजच्या पहिल्याच आठवड्यात १००० कोटींची कमाई करण्याची किमया साधली आहे.

2/9
अशातच भारताचा शेजारी आणि कट्टर शत्रू पाकिस्तानला धुरंधरला मिळणारं यश बघवत नाही आहे. कराचीमधील ल्यारी भागातील नागरिकांची फिल्मच्या कमाईवर नजर असून त्यांनी आता यावर आपला हक्क सांगायला सुरुवात केली आहे.

3/9
धुरंधरची कथा ही पाकिस्तानच्या ल्यारी भागातील गँगवॉरवर आधारित आहे. यामध्ये भारतीय गुप्तहेर इतक्या धोकादायक वातावरणात भारतासाठी आपल्या जीवाची बाजी लावतात हे दाखवण्यात आलं आहे.

4/9
दरम्यान, सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये पाकिस्तानी जनता या चित्रपटाच्या कमाईमधील ८०% वाटा मागत आहे.

5/9
या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एका व्यक्तीला फिल्मच्या कलेक्शनबद्दल विचारलं असता तो म्हणाला,
या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एका व्यक्तीला फिल्मच्या कलेक्शनबद्दल विचारलं असता तो म्हणाला, "माझ्या मते, त्यांनी या कमाईचा ८० टक्के वाटा ल्यारीला द्यायला हवा. चित्रपट बनवणं त्यांचं कामच आहे, एका फिल्मने नाही कमावलं तर दुसरी कमावून देते. पण आमचं काय?"
advertisement
6/9
आणखी एकाने पहिल्याचा पाढा गिरवत म्हटलं,
आणखी एकाने पहिल्याचा पाढा गिरवत म्हटलं, "तुम्ही ८००-९०० कोटी कमावले आहेत. किमान आमच्या 'चील चौक'ला तरी रंगरंगोटी करून द्या. या गरुडामुळेच तुम्ही इतके पैसे कमावलेत, मग किमान या परिसराचा विकास तरी करा!"
advertisement
7/9
हा महाशय ज्या भागाच्या डागडुजीबद्दल बोलत आहे, मुळात तिथे या फिल्मचं शूट झालेलंच नाही. दिग्दर्शक आदित्य धर यांच्या टीमने कमालीची कल्पकता दाखवत संपूर्ण ल्यारी भाग थायलंडमध्ये हुबेहूब उभा केला होता. तब्बल ६ एकरच्या जागेवर हा सेट उभा करण्यात आला होता.

8/9
तिथल्या अरुंद गल्ल्या, भिंतींवरची जुनी पोस्टर्स, वर्तमानपत्रांची कात्रणं आणि चील चौक... दिग्दर्शक आणि सेट डिझायनर्स यांनी आपलं काम इतकं चोख बजावलं आहे की, खुद्द पाकिस्तानात राहणाऱ्यांनाही हा सेट आहे की खरी जागा हे ओळखता आलेलं नाही.

9/9
धुरंधरचं शूटिंग केवळ बँकॉकच नाही, तर लुधियाना, मुंबई, अमृतसर आणि लेह-लडाख यांसारख्या दुर्गम ठिकाणी करण्यात आलं आहे. भारतीय चाहत्यांनी मात्र पाकिस्तानी जनतेच्या या वाटा मागण्यावर सोशल मीडियावर चांगलीच फिरकी घेतली आहे.

IPLमधील 'डील'चे गूढ! संघाची 15,300 कोटींना विक्री; फक्त जुना मालक नाही, BCCIला देखील मिळाले पैसे, गणित वाचून चक्रावून जाल
IPLमधील 'डील'चे गूढ! संघाची 15,300 कोटींना विक्री; जुना मालक नाही, BCCIला देखील मिळाले पैसे, गणित वाचून चक्रावून जाल
  • राजस्थान रॉयल्सची 15,300 कोटींना विक्री

  • मालकाच्या खिशात 3,000 कोटी कमी का?

  • BCCIला किती मिळाले? चक्रावून टाकणारे गणित

View All
advertisement