रणवीरच्या Dhurandhar ला मागे टाकलं, या साऊथ फिल्मचे पुण्यातील शो Sold Out, रिलीजच्या पहिल्याच दिवशी हाऊसफुल
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
South Film Pune Shows Housefull : सिनेप्रेक्षकांमध्ये सध्या एका South Film ची चांगलीच क्रेझ पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे पुण्यातही या फिल्मचे तिकीट सोल्ड आऊट झाले असून शो हाऊसफुल आहेत.
रणवीर सिंह अभिनीत 'धुरंधर' हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटात संजय दत्त, आर. माधवन, अर्जुन रामपाल हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. पण अक्षय खन्नाच्या अभिनयाचं सर्वत्र कौतुक होत आहे. एकीकडे 'धुरंधर' धुमाकूळ घालत असताना दुसरीकडे एक दाक्षिणात्य चित्रपट (South Movies) रिलीज झालाय. त्यामुळे आता ही साऊथ फिल्म 'धुरंधर'ला मागे टाकणार असल्याची दाट शक्यता आहे.
advertisement
'द डेविल' (The Devil) असं या साऊथ फिल्मचं नाव आहे. कन्नड सुपरस्टार दर्शन थुगुदीपा (Kannada Star Darshan) या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटात दर्शनचा अॅक्शन अवतार पाहायला मिळत आहे. 'द डेविल' या चित्रपटात सुपरस्टार दर्शन एका गँगस्टरच्या भूमिकेत आहे. 55 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली होती.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
'द डेविल' हा बहुप्रतीक्षित चित्रपट रिलीज होण्याआधीच त्याचे 150 अर्ली मॉर्निंग शो कर्नाटकात हाऊसफुल होते. कर्नाटकात 90% हा चित्रपट सिंगल स्क्रिन थिएटरमध्ये रिलीज करण्यात आला आहे. सकाळी 6.30 वाजल्यापासून या चित्रपटाचे शो लागले गेले होते. अॅडव्हान्स बुकिंगमध्येच या चित्रपटाने दणदणीत कमाई केली आहे. आता देशभरात या कन्नड फिल्मचा बोलबाला असल्याचं पाहायला मिळत आहे.
advertisement








