Success Story: कचराकुंडी ते नागपूर कलेक्टर ऑफिस... दृष्टीहीन माला पापलकरची थरारक संघर्षकथा! वाचून डोळ्यात येईल पाणी

Last Updated:
Success Story: माला पापलकर यांचा कचराकुंडीपासून नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयातील राजस्व सहायक पदापर्यंतचा प्रेरणादायक संघर्ष जाणून घ्या.
1/7
नशिबाने जरी साथ सोडली तरी कठोर मेहनत आणि इच्छाशक्तीच्या बळावर आयुष्यात काहीही साध्य करता येते, याची प्रेरणादायक कथा म्हणजे माला पापलकर यांचा प्रवास. ज्या दृष्टिहीन नवजात बालिकेला २५ वर्षांपूर्वी जळगाव रेल्वे स्टेशनवर एका कचराकुंडीत फेकून दिलं, त्यांनच आज सरकारी नोकरी मिळवून दृष्टीहीनही कमी नाहीत हे सिद्ध करून दाखवलं.

advertisement
2/7
माला पापलकर आज महाराष्ट्र लोक सेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयात 'राजस्व सहायक' या पदावर रुजू झाल्या आहेत. साधारण २५ वर्षांपूर्वी त्यांच्या जन्मानंतर दृष्टिहीन असल्याने त्यांना जळगाव रेल्वे स्टेशनवर कचराकुंडीत फेकून दिलं.

3/7
ही घटना आजही मनाला चटका लावणारी आहे. पोलिसांनी त्यांना वाचवले आणि बाल कल्याण समितीच्या आदेशानुसार त्यांना अमरावती येथील स्वर्गीय अंबादास पंत वैद्य अनाथालयात पाठवण्यात आले. माला यांच्या आयुष्याला खरी दिशा मिळाली ती समाजसेवक शंकर बाबा पापलकर यांच्यामुळे.

4/7
समाजसेवक शंकर बाबा पापलकर यांनी या चिमुकलीला माला नाव दिलं आणि तिच्या पालनपोषणाची जबाबदारी स्वीकारली. पापलकर यांनी दिलेले नाव आणि आधार हीच माला यांच्यासाठी जगण्याची पहिली मोठी प्रेरणा ठरली.

5/7
दृष्टिहीन असूनही माला यांनी शिक्षणाची कास सोडली नाही. त्यांना शिक्षणाबद्दल तीव्र ओढ होती आणि याच शिक्षणाला त्यांनी आपल्या अंधारलेल्या आयुष्याला प्रकाश देणारी मेणबत्ती ठरेल हा विश्वास होता. त्यांनी अमरावती येथील डॉ. नरेंद्र भिवापूरकर अंध विद्यालयातून १० वी आणि १२ वीची परीक्षा उत्तीर्ण केली.

6/7
पुढे विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था, अमरावती येथून त्यांनी कला शाखेत पदवी मिळवली आणि त्यानंतर पदव्युत्तर शिक्षण देखील पूर्ण केलं. शिक्षणामुळे माला यांच्यासाठी एक नवीन आणि मोठी दुनिया खुली झाली. दृष्टी नसतानाही त्यांनी ज्ञानाच्या बळावर स्वतःचे आयुष्य उभे केले.

7/7
कचराकुंडीपासून सुरू झालेला माला पापलकर यांचा हा प्रवास आज सरकारी कार्यालयातील महत्त्वाच्या पदापर्यंत पोहोचला आहे. त्यांची ही संघर्षमय यशोगाथा सिद्ध करते की, कठीण परिस्थितीतही मेहनत आणि जिद्द कायम ठेवली तर यश नक्कीच मिळते. आज त्या मोठ्या आत्मविश्वासाने आणि उत्साहाने आपली नवी जबाबदारी पार पाडण्यासाठी सज्ज आहेत. त्यांची ही कहाणी प्रत्येक भारतीयासाठी एक अमूल्य प्रेरणा आहे.

CM Devendra Fadnavis: शेतकरी मदतीचा मोठा वाद! १०० कोटींच्या निधीतून फक्त ७५ हजार? CMOनं मौन सोडलं
शेतकरी मदतीचा मोठा वाद! १०० कोटींच्या निधीतून फक्त ७५ हजार? CMOनं मौन सोडलं
  • शेतकरी मदतीचा मोठा वाद! १०० कोटींच्या निधीतून फक्त ७५ हजार? CMOनं मौन सोडलं

View All
advertisement