'मी एका शूर मुलाला जन्म दिला...' सैफ-करिनाने मुलाचं नाव ‘तैमूर’ का ठेवलं? अखेर बेबोने खरं कारण सांगितलंच, म्हणाली...
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Bollywood controversy : १६ ऑक्टोबर २०१२ रोजी करीना आणि सैफचं लग्न झालं होतं आणि २०१६ मध्ये त्यांना तैमूर झाला. त्याच्या नावामुळे दोन्ही कुटुंबियांची बरीच ट्रोलिंग झाली होती.
advertisement
advertisement
advertisement
करीनाने पुढे सांगितलं होतं की, सैफने लहानपणी तैमूरबद्दल खूप काही वाचलं होतं. पण याशिवाय दुसरंही एक कारण होतं. “त्यांच्या शेजाऱ्याचं नावही तैमूर होतं आणि ते नाव सैफला खूप आवडलं होतं. तैमूर नावाचा अर्थ ‘आयर्न मॅन’ म्हणजेच ‘मजबूत माणूस’ असा होतो. सैफने मला हे सांगितलं, तेव्हा मलाही हे नाव खूप आवडलं.”
advertisement
करीनाने 'इंडिया टुडे'सोबत बोलताना एक मोठा खुलासा केला होता. ती म्हणाली, “जेव्हा तैमूरचं नाव ठरवलं, तेव्हा खूप ट्रोलिंग झाली, पण अनेक लोकांनी आम्हाला पाठिंबाही दिला. ज्या दिवशी मी डिलिव्हरीसाठी हॉस्पिटलमध्ये जात होते, तेव्हा सैफने मला विचारलं होतं की, मुलाचं नाव ‘फैज’ ठेवूया का? तो म्हणाला, बेबो! हे नाव एका शायरचं आहे. पण मला ते नाव आवडलं नाही.”
advertisement
advertisement







