अमिताभ बच्चनचा जावई, तरीही 18 वर्षांपासून करतोय स्ट्रगल, 166 कोटींच्या मालकाने दिला नाही एकही हिट
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Amitabh Bachchan Son-in-Law : अमिताभ बच्चन यांच्या जावयाने बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपटांमध्ये काम केले, परंतु त्याला हवी ती ओळख मिळाली नाही. तो ११० कोटींच्या कंपनीचा मालक असूनही, बॉलिवूडमध्ये संघर्ष करत आहे.
advertisement
advertisement
advertisement
कुणाल कपूरने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये स्मरणीय भूमिका साकारल्या आहेत, तरीही त्याला हवी ती ओळख मिळाली नाही. हा हँडसम हंक करिअरच्या सुरुवातीला काही चित्रपटांमध्ये दिसला, परंतु आपल्या सासऱ्यांप्रमाणे प्रभाव सोडण्यात तो अपयशी ठरला. कोट्यवधींच्या कंपनीचा मालक असूनही, तो बॉलिवूडमध्ये आपली छाप सोडू शकला नाही आणि आजही एका सोलो हिटसाठी संघर्ष करत आहे.
advertisement
कुणाल चित्रपटात येण्यापूर्वीच व्यवसायात सक्रिय होता. १८ व्या वर्षी तो हाँगकाँगला आंबे निर्यात करायचा. अभिनेता होण्यासाठी त्याने हे काम सोडले. 'अक्स' चित्रपटातून त्याने करिअरची सुरुवात केली, जिथे तो सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करत होता. नंतर त्याने बैरी जॉनकडून अभिनयाचे प्रशिक्षण घेतले आणि नसीरुद्दीन शाहच्या थिएटर ग्रुप 'मोटले'चा सदस्य झाला.
advertisement
advertisement
advertisement
२०२१ मध्ये 'अनकही कहानियां' आणि 'द एम्पायर' या वेब सीरीजमध्ये तो शेवटचा दिसला, त्यानंतर त्याच्याकडे कोणताही चित्रपट नाही. मात्र तो यशस्वीपणे ११० कोटी रुपयांची कंपनी चालवत आहे. कुणाल क्राउड-फंडिंग प्लॅटफॉर्म केटोचा मालक आहे, ज्याची स्थापना २०१२ मध्ये जहीर अदनवाला आणि वरुण शेठ यांच्या सहकार्याने केली होती.
advertisement
advertisement







