advertisement

गाणं गाण्यासाठी थेट गाठलं बाथरूम अन् ..., लता दीदींच्या अजरामर गाण्याचा युनिक किस्सा

Last Updated:
Lata Mangeshkar Song : लता दीदींनी त्यांच्या संपूर्ण करिअरमध्ये अनेक गाणी गायली. पण त्यांचं अजरामर झालेलं एक गाणं जे त्यांनी बाथरूममध्ये उभं राहून गायलं होतं. तुम्हाला माहितीये का हा किस्सा ?
1/8
हिंदी सिनेमाची दिशी बदलणारा सिनेमा म्हणजे 'मुगल-ए-आझम'. 1960 साली आलेल्या या सिनेमातील गाणी आजही हिट आहेत. प्यार किया तो डरना क्या हे गाणं तर अजरामर आहे.

2/8
लता मंगेशकर यांचा आवाज आणि दिलीप कुमार आणि मधुबाला यांच्यावर चित्रीत झालेलं हे आजही अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. पृथ्वीराज कपूर यांनी भव्य सेट्स, दमदार संवाद आणि अमर गाण्यांमुळे हा सिनेमा एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवला.

3/8
 सिनेमातील जब प्यार किया तो डरना क्या हे आजही अनेकांच्या आवडीचं गाणं. लता दीदींच्या आवाजातील हे गाणं अजरामर आहे. पण तुम्हाला माहिती आहे का हे गाणं त्यांनी बाथरुममध्ये गायलं होतं. काय आहे या गाण्याचा किस्सा?पाहूयात.

4/8
'जब प्यार किया तो डरना क्या' हे गाणं तयार होणं सोपं नव्हतं. तब्बल 105 गाणी नाकारल्यानंतर हे गाणं तयार झालं होतं. अखेरीस जे बोल फायनल झाले ते लिहायला 100 हून अधिक तास लागले.

5/8
संगीतकार नौशाद आणि गायिका लता मंगेशकर यांना हे गाणं एका खास प्रतिध्वनीसह रेकॉर्ड करायचं होतं. पण स्टुडिओमध्ये हवा तसा इको मिळत नव्हता. म्हणून लता दीदींनी हे गाणं बाथरूममध्ये उभं राहून गायलं. बाथरूममधील प्रतिध्वनी माईकमध्ये कैद झाला आणि तिथे या अजरामर कलाकृतीचा जन्म झाला.

6/8
गाण्याच्या चित्रीकरणासाठी एक भव्य काचेचा सेट बांधण्यात आला होता. त्याची एकूण किंमत त्यावेळी 10 लाख रुपये होती.10 लाखातील फक्त 2 लाख रुपये सेट डिझाइनची फी होती.

7/8
दिग्दर्शक के. आसिफ 14 वर्ष या सिनेमावर काम करत होते. सिनेमा तयार होताना अनेक निर्माते बदलले, पैशांच्या अडचणी आल्या पण त्यांनी हार मानली नाही.

8/8
 ‘जब प्यार किया तो डरना क्या’ हे गाणं  जेव्हा आज वाजतं तेव्हा ते फक्त एक गाणं नसून त्या काळातील संघर्ष आणि चित्रपटनिर्मितीचा स्ट्रगल सांगणारं आहे.

PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement