घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री रुग्णालयात दाखल, या आजाराचा करतेय सामना
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Actress Hospitalised : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान रुग्णालयात दाखल झाली आहे. अभिनेत्रीच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत.
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री माही वीज सध्या आपल्या वैयक्तिक आणि व्यवसायिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. माही वीज आण जय भानुशाली काही दिवसांपासून आपल्या घटस्फोटाच्या चर्चांमुळे चर्चेत आहेत. एकीकडे माही जयकडून घटस्फोटाची मोठी रक्कम घेत असल्याचं म्हटलं जात होतं. दुसरीकडे माहीच्या एका जवळच्या मित्राने या अफवांना खोटे ठरवले.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
माहीने आपल्या युट्यूब चॅनलवर आपल्या वैयक्तिक आयुष्याबाबत भाष्य केलं. माही आपला पती जय भानुशालीकडून मागितलेल्या 5 कोटी रुपयांच्या घटस्फोटभरपाईबद्दलही बोलली. तिने स्पष्ट केलं की ज्या महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत, त्यांनी घटस्फोटानंतर आपल्या जोडीदारावर अवलंबून राहण्याऐवजी स्वतः काम करावं. तिने हेही अधोरेखित केलं की ज्या महिला गृहिणी आहेत आणि आर्थिकदृष्ट्या अवलंबून आहेत, त्यांच्यासाठी भरपाई योग्य आहे.
advertisement


