प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत कास्टिंग काऊच, घडलं भयंकर; म्हणाली,'त्याने माझं तोंड धरलं अन्...'
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Bollywood Actress Misbehaved : प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री वयाच्या 21 व्या वर्षी कास्टिंग काऊचची शिकार झाली होती.
बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉय गेल्या अनेक दिवसांपासून मनोरंजनसृष्टीत सक्रीय आहे. छोट्या पडद्यापासून आपल्या करिअरची सुरुवात करणारी मौनी रॉय आता रुपेरी पडदा गाजवत आहे. 40 वर्षीय मौनी रॉयने आपल्या दर्जेदार अभिनयाच्या जोरावर अल्पावधीतच सिने-इंडस्ट्रीत आपलं नाव कमावलं. अभिनयासह मौनी सोशल मीडियावरदेखील चांगलीच सक्रीय असते. अशातच आता अभिनेत्रीने आपल्या करिअरच्या सुरुवातीच्या काळातील एक भीतीदायक अनुभव चाहत्यांसोबत शेअर केला आहे.
advertisement
advertisement
अपूर्वा मुखीजाच्य एका कार्यक्रमात मौनी रॉयने आपल्या भीतीदायक अनुभवाबद्दल भाष्य केलं आहे. मौनी रॉय म्हणाली,"वयाच्या 21 व्या वर्षी मला एका व्यक्तीच्या ऑफिसमध्ये जायचं होतं. या ऑफिसमध्ये मला चित्रपटाची पटकथा ऐकवली जाणार होती. यावेळी एका सीनबाबत मला ऐकवलं जात होतं की चित्रपटातील एक सीनमध्ये एक मुलगी स्विमिंग पूलमध्ये पडून बेशुद्ध होते".
advertisement
मौनी पुढे म्हणाली,"स्क्रिप्टमध्ये असंही होतं की हिरो त्या मुलीला वाचवतो आणि लिपलॉक करत तिला शुद्धित आणतो. त्यानंतर पुढे त्या संबंधित व्यक्तीने माझं तोंड पकडून बोलायला सुरुवात केली. त्यावेळी माझ्यासोबत काय घडतंय मला काही कळत नव्हतं. प्रचंड भीती वाटत होती, अंगावर शहारे आले होते आणि मी तिथून पळ काढला".
advertisement
advertisement
advertisement


