1 तास 42 मिनिटांची हॉरर फिल्म, श्वास रोखून ठेवणारी जुळ्या बहिणींची भयावह कहाणी OTT वर पाहाच

Last Updated:
Horror Film : 1 तास 52 मिनिटांचा हॉरर सिनेमा तुमची झोप उडवणारा आहे. नेटफ्लिक्स या OTT प्लॅटफॉर्मवर तुम्हाला ही फिल्म पाहता येईल.
1/7
 हॉरर चित्रपटांचे तुम्ही चाहते असाल तर अनेक भीतीदायत कथा असणाऱ्या फिल्म तुम्ही पाहिल्या असतील. पण आज आम्ही तुम्हाला अशा एका भन्नाट हॉरर फिल्मबद्दल सांगणार आहोत जो पाहून तुमचा थरकाप उडेल. अंगावर शहारे आणणारा हा चित्रपट चांगलाच हादरवणारा आहे.

advertisement
2/7
 ओटीटीवरील हा सिनेमा एकदा पाहायला घेतला की तुम्ही तो अर्धवट न सोडता पूर्ण पाहालच. या हॉरर चित्रपटातील प्रत्येक सीन, भीतीदायक घुमदारे आवाज आणि थक्क करणारी सर्व पात्र या सर्व गोष्टींमुळे हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.

3/7
 2024 मधील सर्वोत्तम हॉरर चित्रपटांत याचा समावेश आहे. या सिनेमाची कथा एका अशा पात्राभोवती फिरते ज्याचा पाठलाग रहस्यमय पद्धतीने केला जातो. पण हळूहळू रहस्य उलगडतं आणि कळतं की दिसतं तसं काहीच नाही. त्यामागे अजून भयानक गोष्ट दडलेली आहे.

4/7
 2024 मध्ये हा सिनेमा थिएटरमध्ये रिलीज झाला होता. हा सिनेमा पाहिलेला प्रत्येक व्यक्ती याची कथा कधीच विसरू शकत नाही. या चित्रपटाचं दिग्दर्शन हॉरर शैलीसाठी जगभरात प्रसिद्ध असणाऱ्या रिजाल मंतोवान्ती यांनी केलं आहे. या चित्रपटात लूना माया, दारियस सिनाथ्रिया, माकायला रोज हिली, इवोने दलर आणि डेनी रहमान यांसारखे अनेक कलाकार आहेत.

5/7
 1 तास 52 मिनिटांच्या या हॉरर चित्रपटात लूना मायाने सुलास्त्रीच्या आईची भूमिका साकारली आहे, तर दारियस सिनाथ्रियाने वडिलांच्या भूमिकेला न्याय दिला आहे. त्यांना समाला आणि कुमाला अशा जुळ्या मुली आहेत. समाला आणि कुमालाची भूमिका माकायला रोज हिलीने केली आहे. हा इंडोनेशियन सुपरनॅचरल हॉरर चित्रपट आहे. 'सुमाला' असं या चित्रपटाचं नाव आहे.

6/7
 'सुमाला' हे असं नाव आहे ज्यामुळे सेमारंग रीजेंसीतील एका गावातील लोक आजही घाबरतात. रात्र होताच कोणीही बाहेर जाण्याची हिंमत करत नाही, कारण सुमाला मारायला येईल, अशी भीती असते. हा चित्रपट इतर हॉरर चित्रपटांपेक्षा वेगळा आहे. कारण त्याची कथा दोन जुळ्या बहिणींवर आधारित आहे. ज्यातील एक शारीरिकदृष्ट्या कमजोर आहे, तर दुसरीचं निधन झालं असून तिचं भूत घरात भटकत असतं. वडील भीतीपोटी त्या मुलीला मारतात. पण तिचा आत्मा मात्र सर्वांना त्रास देतो तेव्हा कथेत ट्विस्ट येतो.

7/7
 'सुमाला'ला IMDb वर 10 पैकी फक्त 5.8 रेटिंग मिळाली आहे. पण कथेमुळे प्रेक्षकांना हा चित्रपट खूप आवडला आहे. OTT वर रिलीज झालेला हा सिनेमा अल्पावधीतच लोकप्रिय झाला आहे. नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर तुम्हाला हा सिनेमा पाहता येईल.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement