OTT Releases This Week : 'द फॅमिली मॅन 3' ते 'होमबाउंड'; या आठवड्यात ओटीटीवर धमाका, 1-2 नाही 7 फिल्म- वेब सीरिज होतायत रिलीज

Last Updated:
OTT Releases This Week : ओटीटीवर या आठवड्यात मनोरंजनाचा धमाका होणार आहे. या आठवड्यात बहुप्रतीक्षित सीरिज आणि मुव्ही रिलीज होणार आहेत. या यादीत 'द फॅमिली मॅन 3'पासून 'होमबाउंड'पर्यंत ड्रामा, सस्पेन्स, रोमान्स आणि थ्रिलरचा तडका पाहायला मिळणार आहे.
1/7
 होमबाउंड : थिएटर आणि कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये जलवा दाखवल्यानंतर 'होमबाउंड' आता ओटीटीवर रिलीज होण्यास सज्ज आहे. नीरज घायवान दिग्दर्शिक ही फिल्म पत्रकार बशारत पीर यांच्या न्यू यॉर्क टाइम्सच्या एका लेखावर आधारित आहे. या चित्रपटात ईशान खट्टर, विशाल जेठवानी आणि जान्हवी कपूर मुख्य भूमिकेत आहेत. 21 नोव्हेंबरला हा सिनेमा नेटफ्लिक्स या प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.

advertisement
2/7
 द बंगाल फाइल्स : विवेक अग्निहोत्री यांचा बहुचर्चित 'द बंगाल फाइल्स' हा चित्रपट राजकारणातील नाट्यावर आधारित आहे. या चित्रपटात मिथुन चक्रवर्ती, अनुपम खेर, पल्लवी जोशी आणि दर्शन कुमार हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. Zee5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट 21 नोव्हेंबरला रिलीज होणार आहे.

3/7
 जिद्दी इश्क : 'जिद्दी इश्क' ही एक रोमँटिक थ्रिलर सीरिज आहे. आता 21 ऑक्टोबरपासून जिओ हॉटस्टारवर प्रेक्षकांना ही सीरिज पाहता येईल. एका मुलगी आपल्या शिक्षकाच्या प्रेमात पडते त्यानंतर पुढे काय होतं हे या सीरिजमध्ये पाहायला मिळेल. अदिती पोहनकर आणि परमब्रत चट्टोपाध्याय हे कलाकार या सीरिजमध्ये मुख्य भूमिकेत आहेत.

4/7
 डायनिंग विद द कपूर्स : कपूर कुटुंबीय पहिल्यांदच एकत्र एका डॉक्यूसीरिजमध्ये झळकणार आहेत. स्मृती मुधरा दिग्दर्शित अरमान जैन यांनी या सीरिजची निर्मिती केली आहे. या माहितीपटात कपूर कुटुंबियांचे किस्से उलगडले जाणार आहेत. या सीरिजमध्ये कपूर खान, करिश्मा कपूर, रणबीर कपूर, नीतू कपूर, रिद्धीमा कपूर साहनी, रणधीर कपूर आणि आधार जैन हे कलाकार झळकणार आहेत. 21 नोव्हेंबरला ही सीरिज नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे.

5/7
 द फॅमिली मॅन सीझन 3 : मनोज बायपेयी यांची 'द फॅमिली मॅन सीझन 3' ही बहुप्रतीक्षित सीरिज अखेर 21 नोव्हेंबरला प्राईम व्हिडीओवर रिलीज होत आहे. या सीरिजमध्ये प्रेक्षकांना रोमांच, ड्रामा आणि अॅक्शनचा तडका पाहायला मिळेल. प्रियामणि, शारिब हाशमी, जयदीप अहलावत आणि निमरत कौर या सीरिजमध्ये मुख्य भूमिकेत आहेत.

6/7
 द मॅन ऑन द इनसाइड सीझन 2 : 'द मॅन ऑन द इनसाइड सीझन 2' हा माहितीपट मैते अलबर्डी यांच्या 'द मोल एजेंट' या शोमधून प्रेरित होऊन बनवण्यात आला आहे. एका सेवानिवृत्त व्यक्तीची गोष्ट या सीरिजमध्ये दाखवण्यात आली आहे. 20 नोव्हेंबरला ही सीरिज नेटफ्लिक्सवर रिलीज होईल.

7/7
 बॅक टू ब्लॅक : 'बॅक टू ब्लॅक' ही फिल्म लोकप्रिय गायिक एमी वाइनहाउस यांच्या आयुष्यावर आधारित आहे. सॅम टेलर-जॉनसन यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. या सिनेमात एमीचा संघर्ष, संगीत करिअर आणि एकंदरीत आयुष्यातील चढ-उतार दाखवण्यात आले आहेत. मारिसा अबेला, जॅक ओकॉनेल, एडी मार्ल आणि लेस्ली मॅनविल यांचा हा चित्रपट 21 नोव्हेंबरला नेटफ्लिक्सवर रिलीज होत आहे.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement