advertisement

"मनाला वाट्टेल ते बोलणारी तू..."; वडिलांचा अपमान करणाऱ्या जान्हवी किल्लेकरला पॅडीच्या लेकीचे खडेबोल

Last Updated:
जान्हवी किल्लेकर हिनं पॅडी यांना जोकर म्हटलं. ते अनेक वर्ष ओव्हर एक्टिंग करत आले आहेत असं देखील म्हटलं. जान्हवीच्या या वक्तव्यानंतर तिला प्रचंड ट्रोल करण्यात आलं. अनेक मराठी कलाकारांनी जान्हवीबद्दल राग व्यक्त केला. पॅडी यांचा अपमान त्यांच्या लेकीला देखील सहन झाला. त्यांची लेक ग्रीष्मा कांबळे हिनं सोशल मीडियावर पोस्ट लिहित जान्हवीला खडेबोल सुनावले आहेत.
1/6
मराठी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेते पंढरीनाथ कांबळे सध्या बिग बॉसच्या घरात आहेत. पहिल्या दोन आठवड्यानंतर पॅडी यांनी त्यांचा गेम ऑन केला. घरात बेताल वक्तव्य करणाऱ्या जान्हवी किल्लेदार पॅडी तोडीस तोड उत्तर देताना दिसतात.

2/6
ग्रीष्मानं तिच्या पोस्टमध्ये लिहिलंय, "प्रिय "अभिनेत्री" जान्हवी किल्लेकर. जितकं स्पष्ट तू स्वतःचं नाव उच्चारत नसशील तितकं स्पष्ट आणि आदराने बाबा तुझं नाव घेतो. मुखावाटे बाहेर पडलेल्या प्रत्येक शब्दाचा अर्थ, महत्त्व, वजन आणि टायमिंग या गोष्टींची समज आणि भान पंढरीनाथ कांबळेला आहे हे त्याने सिद्ध केलं आणि म्हणूनच तुझ्या अपमानाला कोणतीही मर्यादा नं ओलांडता अगदी संयमाने योग्य असं उत्तर दिलं".

3/6
"खरतर "overacting" हा शब्द तुझ्या तोंडून निघणं हे हास्यास्पद आहे. हे बघ साधी गोष्ट आहे, contestents च्या घरात सुरू असलेल्या गेम बद्दल तू हवं तेवढा बोलू शकतेस पण त्यांच्या वयक्तिक आयुष्यावर बोलण्यासाठी especially वर्षा उसगावकर आणि पंढरीनाथ कांबळे यांच्या करिअरवर बोलण्याआधी तुला त्यांच्या एवढी मराठी इंडस्ट्रीत स्वतःची ओळख कमवावी लागेल त्याचप्रमाणे महाराष्ट्रातल्या असंख्य प्रेक्षकांची मनही जिंकावी लागतील. कारण नसताना सतत आपल्यापेक्षा वयाने आणि कर्तृत्वाने मोठ्या असलेल्या लोकांविषयी अनादर करणं हा गेम नाही".

4/6
 ग्रीष्माने पुढे लिहिलंय, "मुळात समोरच्याचा अपमान करणं हा बाबाचा स्वभाव नाही. तुझ्या पातळीला न उतरून त्याने स्वतःची, गेमची आणि विशेष म्हणजे तुझी प्रतिष्ठा राखली आहे. संतापात डोक्याचा ताबा हरवून मनाला वाट्टेल ते बोलणारी तू निक्की तांबोळीची सावलीच आहेस".

5/6
"जेव्हा गेम बाहेर असलेल्या तुझ्या लेकराचा विनाकारण उल्लेख झाला तेव्हा तुला ते पटलं नाही....आज तू गेम बाहेरच्या, बाबाने लेकरा सारखाच वाढवलेल्या,फुलवलेल्या करिअर विषयी एवढं बोललीस ते मात्र तुला पटलं !! हा तुझा "Fair Game" संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय एवढं लक्षात ठेव", असंही ग्रीष्मा म्हणाली.

6/6
तिनं शेवटी लिहिलं, "त्याच्या संस्कारात वाढली आहे मी, त्यामुळे जर माझ्या बोलण्यामुळे तुझ्या भावना दुखावल्या असतील तर मी तुझी माफी मागते. माझा हेतू फक्त त्याची लेक म्हणून स्वतःचं मत मांडणं एवढाच आहे".

PAK vs NZ :  पाकिस्तानचा गेम ओव्हर, लाहोरच रिटर्न तिकीट कन्फर्म! पावसामुळे वर्ल्डकपमधून बाहेर होण्यावर शिक्काच मारला
पाकिस्तानचा गेम ओव्हर, लाहोरच रिटर्न तिकीट कन्फर्म! पावसामुळे वर्ल्डकपमधून बाहेर
  • पाकिस्तान वर्ल्डकपमधून बाहेर होणार

  • न्यूझीलंड विरूद्ध सामना पावसामुळे रद्द

  • पावसाने पाकिस्तानचा गेम केला

View All
advertisement