रणबीर कपूर दुसऱ्यांदा बाबा होण्यासाठी तयार? आलियाच्या प्रेग्नेंसीच्या चर्चांदरम्यान म्हणाला 'मला पुन्हा...'
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Ranbir Kapoor Family : आपल्या 'ॲनिमल' चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान, रणबीरने आपल्या वाढत्या कुटुंबाबद्दलच्या अपेक्षा व्यक्त केल्या.
बॉलिवूडचा लाडका अभिनेता रणबीर कपूर याने नुकतंच अभिनेते आणि राजकारणी नंदमुरी बालकृष्ण यांच्यासोबत एक दिलखुलास गप्पांची मैफल जमवली. या गप्पांमध्ये रणबीरने आपल्या व्यावसायिक आणि खासगी आयुष्याबद्दल अनेक गोष्टी शेअर केल्या. विशेष म्हणजे, याचवेळी त्याने आपल्या भविष्यातील 'फॅमिली प्लॅनिंग'बद्दलही साउथच्या या अभिनेत्याशी चर्चा केली. एका वडिलांच्या भूमिकेतून आपली स्वप्नं काय आहेत, हे रणबीरने मोकळेपणाने सांगितले.
advertisement
advertisement
advertisement
रणबीरने कबूल केले, "मला नेहमीच एक मुलगी हवी होती. माझे दुसरे बाळ जरी झाले, तरी मला आशा आहे की ती देखील एक मुलगीच असेल. कारण मला नेहमीच एक मुलगी हवी होती." त्याच्या या मनापासूनच्या बोलण्यातून केवळ त्याची लाडकी मुलगी राहावरील प्रेमच नाही, तर पालकत्वाकडे पाहण्याचा त्याचा पुरोगामी दृष्टिकोनही दिसून येतो.
advertisement
advertisement
advertisement
रणबीर कपूर सध्या संजय लीला भन्साळी यांच्या 'लव्ह अँड वॉर' या चित्रपटात व्यस्त आहे. २००७ मध्ये 'सावरिया'मधून पदार्पण केल्यापासून तो पहिल्यांदाच भन्साळींसोबत काम करत आहे. या चित्रपटात तो आलिया भट्ट आणि विक्की कौशलसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. याशिवाय, तो नितेश तिवारी यांच्या 'रामायण' मध्ये भगवान रामाची भूमिका साकारताना दिसणार आहे, ज्यात सीतेच्या भूमिकेत साई पल्लवी, भगवान हनुमानाच्या भूमिकेत सनी देओल आणि रावणाच्या भूमिकेत यश असे अनेक मोठे स्टार्स आहेत. 'रामायण' २०२६ च्या दिवाळीत प्रदर्शित होणार असून, त्याचा दुसरा भाग २०२७ च्या दिवाळीसाठी नियोजित आहे.