Rinku Rajguru: मरीन ड्राईव्हवर रिंकूचं फोटोशूट, साडी नेसून दिल्या 'किलर' पोझ; PHOTO पाहून व्हाल घायाळ
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
Rinku Rajguru: ‘सैराट’ चित्रपटातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री रिंकू राजगुरू पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी तिचं चर्चेत येण्याचं कारण म्हणजे नवं फोटोशूट. जे सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होत आहे.
‘सैराट’ चित्रपटातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री रिंकू राजगुरू पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी तिचं चर्चेत येण्याचं कारण म्हणजे नवं फोटोशूट. जे सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होत आहे.
advertisement
मुंबईच्या मरीन ड्राईव्ह परिसरात रिंकूने नुकतंच एक खास फोटोशूट केलं असून तिचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.
advertisement
या फोटोशूटमध्ये रिंकूने फिकट केशरी रंगाची कॉटन साडी परिधान केली आहे. साधा मेकअप, हलकं जुळं बांधलेले केस आणि साडीचा पारंपरिक लूक तिच्या व्यक्तिमत्त्वाला वेगळाच चार्म देतो. समुद्रकिनाऱ्यावर बसून घेतलेले हे फोटो तिच्या नैसर्गिक सौंदर्याला अधिक उठाव देतात.
advertisement
रिंकू राजगुरूच्या या फोटोंमुळे तिच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. काहींनी अंदाज वर्तवला आहे की हे फोटोशूट तिच्या आगामी प्रोजेक्टसाठी असावं. सध्या रिंकू काही नव्या वेब सीरिज आणि मराठी चित्रपटांमध्ये काम करत असल्याची चर्चा आहे.
advertisement
‘सैराट’पासून ते ‘झुंड’ आणि ‘हंड्रेड’पर्यंत, रिंकूने प्रत्येक भूमिकेत स्वतःला सिद्ध केलं आहे. तिचा हा साडीतील लूक हे दाखवतो की ती फक्त दमदार अभिनेत्रीच नाही, तर पारंपरिक भारतीय सौंदर्याची ओळखदेखील आहे.
advertisement
रिंकू राजगुरूचे हे नवीन फोटो सध्या इन्स्टाग्राम आणि एक्स (ट्विटर)वर ट्रेंडिंग आहेत, आणि चाहत्यांकडून त्यांना हजारो लाईक्स आणि कमेंट्स मिळत आहेत.
advertisement