Netflix Movie: रोमँटिक थ्रिलर सिनेमा; थिएटरमध्ये फ्लॉप, पण ओटीटीवर सुपरहिट, नेटफ्लिक्सवर करतोय ट्रेंड

Last Updated:
Netflix Movie: चित्रपटगृहात चालली नाही, पण ओटीटीवर मात्र धुमाकूळ घालत आहे अस अनेक सिनेमे आहेत. अशाच एका सिनेमाविषयी जाणून घेऊया जो थिएटरमध्ये कमाल करु शकला नाही मात्र ओटीटीवर चांगलाच ट्रेंड होत आहे.
1/7
चित्रपटगृहात चालली नाही, पण ओटीटीवर मात्र धुमाकूळ घालत आहे अस अनेक सिनेमे आहेत. अशाच एका सिनेमाविषयी जाणून घेऊया जो थिएटरमध्ये कमाल करु शकला नाही मात्र ओटीटीवर चांगलाच ट्रेंड होत आहे.

advertisement
2/7
26 सप्टेंबरला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने काही दिवसांतच जबरदस्त लोकप्रियता मिळवली आहे. सध्या तो भारताच्या टॉप 10 ट्रेंडिंग चित्रपटांमध्ये सहाव्या क्रमांकावर आहे.

3/7
आपण बोलत असलेल्या या सिनेमाचं नाव आहे 'धडक 2'. या चित्रपटात सिद्धांत चतुर्वेदी एका गरीब, खालच्या जातीच्या मुलाच्या भूमिकेत दिसतो, तर तृप्ती डिमरी साकारते उच्चभ्रू कुटुंबातील विधीची भूमिका.

4/7
दोघांचं कॉलेजमध्ये प्रेम जडतं, पण जातीच्या भिंती आणि समाजाचे नियम त्यांच्या प्रेमात अडथळे आणतात. धमक्या, हिंसा आणि विरोधाच्या सावलीतही हे दोघे एकमेकांवर ठाम राहतात. शेवटी त्यांचं प्रेम जिंकतं की समाज? हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांनी नेटफ्लिक्सचा रिमोट हातात घेतलाय.

5/7
दोघांची जोडी पडद्यावर पाहून प्रेक्षक म्हणत आहेत “ही जोडीच या पिढीची नवी धडक आहे!” सिद्धांतच्या नैसर्गिक अभिनयाला आणि तृप्तीच्या भावनिक अभिव्यक्तींना खूप दाद मिळत आहे. त्यांच्या सोबत अनुभवी कलाकार सौरभ सचदेवा यांनीही दमदार भूमिका केली आहे.

6/7
यंदा ओटीटीवर पुन्हा लोकप्रिय झालेल्या चित्रपटांमध्ये ‘धडक 2’, ‘वॉर 2’, ‘कांतारा’ आणि ‘महावतार नरसिंह’ हे चित्रपट सध्या चर्चेत आहेत. विशेष म्हणजे, वॉर 2 थिएटरमध्येही फार यशस्वी ठरला नव्हता, पण नेटफ्लिक्सवर पहिल्या क्रमांकावर ट्रेंड होत आहे.

7/7
दरम्यान, ज्यांनी थिएटरमध्ये ‘धडक 2’ चुकवला ते आता नेटफ्लिक्सवर याचा घरबसल्या आनंद घेऊ शकतात.

OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement