Sharad Ponkshe: 'या मुंबईचं काहीतरी होऊ शकतं', बाळासाहेबांचं नाव घेत शरद पोंक्षेंनी व्यक्त केली भीती
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
Sharad Ponkshe: अभिनेते शरद पोंक्षे हे नेहमीच आपल्या परखड आणि स्पष्ट वक्तव्यांसाठी ओळखले जातात. ते नेहमीच प्रत्येक विषयावर आपलं मत मांडत असतात. अशातच आता शरद पोंक्षेंचा नवा व्हिडिओ व्हायरल होतोय. यामध्ये त्यांनी बाळासाहेबांचे ते शब्द खरे ठरल्याचं सांगितलं.
अभिनेते शरद पोंक्षे हे नेहमीच आपल्या परखड आणि स्पष्ट वक्तव्यांसाठी ओळखले जातात. ते नेहमीच प्रत्येक विषयावर आपलं मत मांडत असतात. अशातच आता शरद पोंक्षेंचा नवा व्हिडिओ व्हायरल होतोय. यामध्ये त्यांनी बाळासाहेबांचे ते शब्द खरे ठरल्याचं सांगितलं. हा व्हिडिओ नेमका काय आहे? आणि शरद पोंक्षे बाळासाहेबांच्या कोणत्या शब्दांविषयी बोलले आहेत याविषयी पाहूया.
advertisement
देशातील वाढत्या लोकसंख्येवर आणि विशेषतः मुंबई-पुण्यासारख्या शहरांवरील वाढत्या ताणावर चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे 1995 मधील भाषण आठवताना सांगितले की, "मुंबईत येणारे लोंढे आता थांबायला हवेत, अन्यथा एक दिवस ही मुंबई फुटेल." त्यांनी इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर केला असून तो सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
बाळासाहेब ठाकरे यांची दूरदृष्टी खरी ठरतेय? 1995 मध्ये बाळासाहेब ठाकरे यांनीच सांगितलं होतं की, "मुंबईतील लोंढे रोखले गेले नाहीत, तर शहराची घडी विस्कटेल." 1947 साली जे मुसलमान काँग्रेसच्या कृपेने येथे राहिले ते तीन कोटी होते. 78 वर्षात ते 30 कोटी झाले आहे. म्हणजेच जवळपास 10 टक्क्यांनी वाढले. त्यांची जेव्हा लोकसंख्या वाढते तेव्हा काय होतं? आता काही महिन्यांपूर्वी बांगलादेशमध्ये पाहिलं ना ते घडतं. माझ्या राजकीय राजकारण करणाऱ्या सर्व राजकीय पक्षांच्या नेतृत्वांना कळकळीची विनंती आहे की, मुंबई पुण्यासारखे शहरातले लोंढे आता थांबवा. खर तर थांबवण्याची फार गरज आहे. ही मुंबई एक दिवस फुटे.
advertisement
शरद पोंक्षे यांच्या मते, आजच्या परिस्थितीवर त्यांची ही भविष्यवाणी खरी ठरताना दिसत आहे. लोकसंख्या वाढत आहे, शहरांवरचा भार वाढतोय, पण कोणताही राजकीय पक्ष यावर उपाययोजना करताना दिसत नाही. झोपडपट्ट्या अधिकृत करून मतांसाठी राजकारण केले जाते," अशी टीका करत त्यांनी शहराच्या नियोजनाबाबत चिंता व्यक्त केली.


