advertisement

Mrs Deshpande रिलीज होताच सिद्धार्थ चांदेकरनं शेअर केला माधुरीसोबतचा तो फोटो! म्हणाला, 'न पाहिलेलं स्वप्न...'

Last Updated:
Sidharth Chandekar Post for Mrs Deshpande : अभिनेत्री माधुरी दीक्षितची मिसेस देशपांडे ही सीरिज नुकतीच रिलीज झाली आहे. सीरिज रिलीज होताच अभिनेता सिद्धार्थ चांदेकरनं खास पोस्ट शेअर केली आहे.
1/7
अभिनेत्री माधुरी दीक्षितची बहुप्रतिक्षित मिसेस देशपांडे ही वेब सीरिज अखेर जिओ हॉटस्टारवर रिलीज जाली आहे. वेब सीरिज रिलीज होताच सोशल मीडियावर ट्रेंडमध्ये आली आहे. माधुरी दीक्षित यात एका सीरियल किलरची भूमिका साकारत आहे.

2/7
विशेष म्हणजे या सीरिजमध्ये मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ चांदेकरही प्रेक्षकांच्या भेटीला आाल आहे. यात तो माधुरी दीक्षितसोबत स्क्रिन शेअर करतोय. 
विशेष म्हणजे या सीरिजमध्ये मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ चांदेकरही प्रेक्षकांच्या भेटीला आाल आहे. यात तो माधुरी दीक्षितसोबत स्क्रिन शेअर करतोय. 
advertisement
3/7
अभिनेता सिद्धार्थ चांदेकर मिसेस देशपांडेमध्ये डिटेक्टिव्ह तेजस फडके ही महत्त्वाची भूमिका साकारत आहे. माधुरीसारख्या दिग्गज अभिनेत्रीबरोबर स्क्रीन शेअर करणं हे सिद्धार्थसाठी एक मोठं स्वप्न होतं. 

4/7
सीरिज रिलीज होताच सिद्धार्थनं सोशल मीडियावर माधुरी दीक्षितसोबतचा एक खास फोटो शेअर केला. हा फोटो मिसेस देशपांडेमध्ये एक सीन दरम्यानचा आहे. यात सिद्धार्थ जेवायला बसला आहे आणि माधुरी त्याच्याकडे प्रेमानं पाहत आहे. 

5/7
या फोटोसोबत सिद्धार्थनं लिहिलेलं कॅप्शनने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. सिद्धार्थनं लिहिलंय,
या फोटोसोबत सिद्धार्थनं लिहिलेलं कॅप्शनने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. सिद्धार्थनं लिहिलंय, "काही लोकांची स्वप्न पूर्ण होतात, तर काही लोकांची न पाहिलेली स्वप्न पण पूर्ण होतात. हे त्यातलंच एक. Mrs Deshpande आजपासून तुमच्या हवाले!"
advertisement
6/7
सिद्धार्थच्या या पोस्टवर अनेक कलाकारांनी आणि चाहत्यांनी शुभेच्छा देत प्रेम व्यक्त केलं आहे. ‘Mrs Deshpande’ या सीरिजमध्ये सिद्धार्थ चांदेकर माधुरी दीक्षितचा मुलगा दाखवण्यात आला आहे. क्राइम थ्रीलर असलेल्या या सीरिजमधून माधुरीचा आजवर कधीन ना पाहिलेला अवतार पाहायला मिळणार आहे. तिच्यासोबत सिद्धार्थ चांदेकरसारख्या मराठी अभिनेत्याची उपस्थिती ही मराठी प्रेक्षकांसाठी विशेष आनंदाची बाब ठरत आहे.

7/7
सीरिजमधील माधुरी-सिद्धार्थ यांची आई-मुलाची केमिस्ट्री आणि सिद्धार्थची डिटेक्टिव्ह म्हणून असलेली भूमिका प्रेक्षकांना किती आवडतेय याची उत्सुकता सगळ्यांना आहे. नेहमीच आपल्या स्माइलनं, अदांनी प्रेक्षकांना भुरळ पाडणारी माधुरी मिसेस देशपांडेमध्ये तिच्या गूढ स्माइलनं धडकी भरवतेय. तिचा आजवर कधीच न पाहिलेला हा अवतार पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.  
[caption id="attachment_1536294" align="aligncenter" width="1200"] सीरिजमधील माधुरी-सिद्धार्थ यांची आई-मुलाची केमिस्ट्री आणि सिद्धार्थची डिटेक्टिव्ह म्हणून असलेली भूमिका प्रेक्षकांना किती आवडतेय याची उत्सुकता सगळ्यांना आहे. नेहमीच आपल्या स्माइलनं, अदांनी प्रेक्षकांना भुरळ पाडणारी माधुरी मिसेस देशपांडेमध्ये तिच्या गूढ स्माइलनं धडकी भरवतेय. तिचा आजवर कधीच न पाहिलेला हा अवतार पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. [/caption]
advertisement
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार, चालून आला गोल्डन चान्स
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार
  • गुंतवणूकदारांसाठी सर्वात मोठा जॅकपॉट

  • LIC आणि SBI कडून होणार शेअर्स विक्री

  • तुमचा वाटा मिळवण्यासाठी आतापासूनच प्लॅन करा

View All
advertisement