'कोणीच असं सांगितलं नाही की...', राज निदिमोरुसोबतच्या अफेअरच्या चर्चांमध्ये खऱ्या प्रेमाबद्दल काय म्हणाली समंथा प्रभू?

Last Updated:
Samantha Raj Nidimoru Affair Rumours: सध्या समंथाचं नाव प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक राज निदिमोरु यांच्यासोबत जोडलं जात आहे. या डेटिंगच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला नसतानाच, समंथाने नुकतीच ‘खऱ्या प्रेमा’वर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.
1/8
Samantha Ruth Prabhu, Samantha Ruth Prabhu dating rumours, Samantha Ruth Prabhu Instagram, finding true love, bollywood
मुंबई: दाक्षिणात्य आणि बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाने छाप सोडणारी अभिनेत्री समंथा रुथ प्रभू गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे सतत चर्चेत आहे. अभिनेता नागा चैतन्यपासून घटस्फोट घेतल्यानंतर, सध्या तिचं नाव प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक राज निदिमोरु यांच्यासोबत जोडलं जात आहे. या डेटिंगच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला नसतानाच, समंथाने नुकतीचखऱ्या प्रेमा’वर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामुळे पुन्हा एकदा बरीच चर्चा सुरू झाली आहे.
advertisement
2/8
Samantha Ruth Prabhu, Samantha Ruth Prabhu dating rumours, Samantha Ruth Prabhu Instagram, finding true love, bollywood
समंथा आणि राज निदिमोरु अनेकदा एकत्र दिसले आहेत, ज्यामुळे त्यांच्या अफेअरच्या चर्चांना जोर आला आहे. या सगळ्या गॉसिप्सच्या पार्श्वभूमीवर समंथाने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ आणि मोठा कॅप्शन शेअर केला आहे, ज्यात तिने ‘तिशीतील महिलांचे अनुभव’ आणि ‘प्रेम’ यावर मनमोकळं आपलं मत मांडलं आहे.
advertisement
3/8
Samantha Ruth Prabhu, Samantha Ruth Prabhu dating rumours, Samantha Ruth Prabhu Instagram, finding true love, bollywood
ती म्हणाली, “जग तुम्हाला सांगतं की, तिशीनंतर सगळं काही खाली जायला लागतं. तुमचा नूर फिका पडतो, सौंदर्य कमी होतं, म्हणून वीशीतच तुम्ही घाई करा!”
advertisement
4/8
Samantha Ruth Prabhu, Samantha Ruth Prabhu dating rumours, Samantha Ruth Prabhu Instagram, finding true love, bollywood
समंथाने पुढे सांगितलं की, “माझी वीशी खूप बेचैन आणि गोंधळाची होती. मी घाईत जगायचे. परिपूर्ण दिसायचं, परिपूर्ण व्हायचं, असा दिखावा करायचे, जेणेकरून माझ्या आतमध्ये मी किती हरवलेली आहे, हे कुणाला दिसणार नाही.”
advertisement
5/8
Samantha Ruth Prabhu, Samantha Ruth Prabhu dating rumours, Samantha Ruth Prabhu Instagram, finding true love, bollywood
तिने एक खूप मोठी गोष्ट कबूल केली. ती म्हणाली, “कुणीच मला सांगितलं नाही की, मी जशी आहे, तशीच परफेक्ट होते. कुणीच मला सांगितलं नाही की, प्रेम किंवा खरं प्रेम मला तेव्हाच मिळेल, जेव्हा मी स्वतःला दुसऱ्यासाठी बदलण्याचा प्रयत्न करणार नाही.”
advertisement
6/8
Samantha Ruth Prabhu, Samantha Ruth Prabhu dating rumours, Samantha Ruth Prabhu Instagram, finding true love, bollywood
समंथा म्हणते की, तिशीत आल्यावर अनेक गोष्टी शांत झाल्या, जुन्या चुकांचं ओझं तिने फेकून दिलं. “मी दोन आयुष्य जगणं बंद केलं. एक जे जगाला दाखवत होते आणि दुसरे जे शांतपणे जगले. आता जी व्यक्ती मी सर्वांसमोर आहे, तीच मी एकटी असतानाही असते.”
advertisement
7/8
Samantha Ruth Prabhu, Samantha Ruth Prabhu dating rumours, Samantha Ruth Prabhu Instagram, finding true love, bollywood
अभिनेत्रीने अखेरीस प्रत्येक मुलीला आवाहन केलं आहे की, धावणं थांबवा आणि स्वतःकडे परत या, कारण जेव्हा तुम्ही पूर्णपणे स्वतः असता, तेव्हाच तुम्हाला खरी ‘शांतीमिळते.
advertisement
8/8
Samantha Ruth Prabhu, Samantha Ruth Prabhu dating rumours, Samantha Ruth Prabhu Instagram, finding true love, bollywood
राज निदिमोरु आणि कृष्णा डीके यांच्या आगामी ‘रक्त ब्रह्मांड: द ब्लडी किंगडम’ या ॲक्शन फँटसी सीरीजमध्ये समंथा महत्त्वाची भूमिका साकारणार आहे.
advertisement
Guess Who: 15 व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज कोट्यवधींची मालकीण आहे ही अभिनेत्री
15व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज अभिनेत्री कोट्यवधींची मालकीण
    View All
    advertisement