सुनील शेट्टीचा फिटनेस फंडा! सकाळी 6 वाजता जीम, आण्णा दुपारी 1 वाजता करतो महत्त्वाचं काम, ते काय?
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Suniel Shetty Fitness : सुनील शेट्टी आज वयाच्या 65 व्या वर्षीही फिटनेसफ्रिक आहेत. नुकतंच एका मुलाखतीत त्यांनी त्यांच्या फिटनेसचं रहस्य, डाएट रुटिन शेअर केलं आहे.
advertisement
सुनील शेट्टी एबीपीसोबत आपला फिटनेस फंडा शेअर करत म्हणाले,"लहानपणापासूनच मी स्पोर्ट्ससोबत जोडला गेलो होतो. शाळेत असताना मी स्पोर्ट्सचा कॅप्टन होतो. लहान असतानाच मी मार्शल आर्ट्सचं प्रशिक्षण घ्यायला सुरुवात केली होती. लाइफस्टाइल, डाएट, एकमेकांचा आदर करणं या सर्व गोष्टी मी मार्शल आर्ट्समुळे शिकलो. लोकांना ताकद दाखवण्यापेक्षा स्वत:ला फिट ठेवण्यासाठी मी मार्शल आर्ट्स शिकत होतो.
advertisement
सुनील शेट्टी फिटनेसबद्दल बोलताना म्हणाले,"सात-आठ तासाची झोप खूप महत्त्वाची असते. एखाद्या गोष्टीत सातत्य ठेवलं की शिस्त येते. मी रोज सकाळी साडे पाच वाजता उठतो, सहा वाजता जीमला जातो. वेट ट्रेनिंग, प्रोटिन या सर्व गोष्टींमध्ये सातत्य ठेवतो. माझ्यासाठी फिटनेस म्हणजे आनंद. मी दररोज 1600-2000 कॅलरी इनटेक करतो".
advertisement
advertisement
advertisement
advertisement


