रोमँटिक कोरियन ड्रामा पाहायला आवडतात? मग OTT वरील हे TOP 5 शो तुमच्या पार्टनरसोबत नक्की पाहा
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Korean Drama Shows OTT : रोमँटिक कोरियन ड्रामा पाहायला आवडत असतील तर ओटीटीवरील हे पाच शो तुमच्या पार्टनरसोबत नक्की पाहा.
advertisement
advertisement
डियर होंगरांग : ओटीटीवरील सर्वोत्कृष्ट रोमँटिक कोरियन ड्रामामध्ये 'डियर होंगरांग' पहिल्या स्थानावर आहे. या ड्रामाची कथा खूपच प्रभावी आहे. यात एका बेपत्ता वारसाची गोष्ट दाखवण्यात आली आहे, जो मोठ्या काळापासून आपल्या कुटुंबापासून दूर असतो. या ड्रामामध्ये रोमांससोबतच थ्रिल आणि सस्पेन्स पाहायला मिळेल. हा शो प्रेक्षकांना नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येईल.
advertisement
लव्ह स्टक इन द सिटी : 'लव्ह स्टक इन द सिटी' हा शो दुसऱ्या स्थानावर आहे. या ड्रामामध्ये प्रेक्षकांना एक महत्त्वकांक्षी आर्किटेक्ट आणि फ्री-स्पिरिटेड महिलेची गोष्ट दाखवण्यात आली आहे. या ड्रामामध्ये जबरदस्त रोमांच आणि रोमान्स पाहायला मिळतो. हा रोमँटिक कोरियन ड्रामा तुम्ही अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर पाहू शकता.
advertisement
advertisement
advertisement










