Chamkila : कोण होता अमरसिंग चमकिला, दोघांना का मारलं ठार अजून आरोपी का पकडले नाही?
- Published by:News18 Marathi
- trending desk
Last Updated:
इम्तियाज अली यांनी दिग्दर्शित केलेल्या 'चमकिला' चित्रपटाची ओटीटी जगात खूप चर्चा होत आहे. पंजाबचे रॉकस्टार अशी ओळख असलेल्या अमरसिंग चमकिला यांच्या जीवनावर हा चित्रपट आधारित आहे. कमी वयात लोकप्रियता मिळवणाऱ्या या गायकाचा 27व्या वर्षी खून झाला होता. एल्विस ऑफ पंजाब म्हणवले जाणारे चमकिला कोण होते, ते जाणून घेऊ या.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
अमरसिंग चमकिला यांची सर्वच गाणी लोकप्रिय असली तरी सर्वाधिक हिट गाण्यांमध्ये 'ललकरे नाल', भक्तिगीत 'बाबा तेरा ननकाना' आणि 'तलवार में कलगीधर दी' यांचा समावेश आहे. त्यांनी लिहिलेल्या 'जट्ट दी दुश्मन' गाण्याची आजवर अनेक पंजाबी कलाकारांनी रेकॉर्डिंग केलं आहे. चमकिला यांना पहिल्या रेकॉर्ड केलेल्या 'टाकुए ते टाकुआ' गाण्यानंतर खूप यश मिळालं होतं.
advertisement









