कधी तोडफोड, कधी बंदी, 'धुरंधर' ते 'छावा', 2025 मध्ये वादाच्या भोवऱ्यात अडकल्या या 9 फिल्म
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Year Ender 2025 : बॉलिवूडच्या काही चित्रपटांनी 2025 मध्ये बॉक्स ऑफिसवर दणदणीत कमाई केली. पण काही फिल्म मात्र वादाच्या भोवऱ्यात अडकल्या.
इमरजेन्सी (Emergency) : कंगना रनौतचा 'इमरजेन्सी' हा चित्रपट 17 जानेवारीला प्रदर्शित झाला होता. 1975 मधील इमरजेन्सीवर आधारित या चित्रपटात कंगना रनौत इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत होती. रिलीजआधीच हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला. सिख संघटनांकडून या चित्रपटाला विरोध करण्यात आला होता. पण तरीही हा चित्रपट रिलीज झाला. कंगनाच्या अभिनयाचं कौतुक झालं. पण बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात हा चित्रपट कमी पडला.
advertisement
छावा (Chhava) : विकी कौशल स्टारर 'छावा' हा चित्रपट 14 जानेवारी 2025 रोजी थिएटरमध्ये रिलीज झाला होता. छत्रपती संभाजी महाराज यांच्या आयुष्यावर आधारित या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होताच हा वादाच्या भोवऱ्यात अडकला. चित्रपटातील एका गाण्यात छत्रपती संभाजी महाराज डान्स करताना दाखवल्याने या चित्रपटावर मोठ्या प्रमाणात विरोध झाला. पुढे या चित्रपटातून डान्स करतानाचा सीन हटवण्यात आला. पण फिल्म मात्र चर्चेत राहिली.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
धुरंधर (Dhurandhar) : आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' ही फिल्म 5 डिसेंबर 2025 रोजी थिएटरमध्ये रिलीज करण्यात आली असून बॉक्स ऑफिसवर दणदणीत कमाई करत आहे. मेजर मोहित शर्मा यांच्या कुटुंबियांनी दावा केला होता की ही फिल्म त्यांच्या मुलावर आधारित आहे. पण पुढे सेन्सॉर बोर्डने काल्पनिक ठरवत या चित्रपटाच्या रिलीजला हिरवा कंदील दिला.










