Skin Care Tips : नाभीवर लावा किचनमधील 'या' 2 वस्तू; हिवाळ्यातही त्वचा राहील हायड्रेटेड, मऊ आणि फ्रेश!
- Published by:Pooja Jagtap
- local18
Last Updated:
How to take care of dry skin : हिवाळ्यात त्वचा रूक्ष आणि कोरडी होणे ही एक सामान्य समस्या आहे. ही समस्या केवळ त्वचेच्या सौंदर्याशीच नाही, तर तिच्या आरोग्याशी देखील जोडलेली आहे. थंड हवा, वारंवार गरम पाण्याचा वापर आणि घरांमध्ये हीटर चालवल्याने त्वचेतील नैसर्गिक ओलावा कमी होतो, ज्यामुळे त्वचा निस्तेज दिसू लागते. यावर यावर एक अगदी सोपा उपाय सांगणार आहोत.
हिवाळ्यात त्वचा निरोगी ठेवण्यासाठी लोक बाजारात उपलब्ध असलेले मॉइश्चरायझर किंवा विविध स्किन प्रोडक्ट्सचा वापर करतात. मात्र, जर त्वचेच्या कोरडेपणावर योग्य पद्धतीने आणि मुळापासून लक्ष दिले नाही, तर या उत्पादनांचा अपेक्षित फायदा मिळत नाही. त्वचेच्या कोरडेपणाची मुख्य कारणे केवळ बाह्य नसून, शरीरातील ओलाव्याची किंवा आर्द्रतेचे कमतरता, निर्जलीकरण आणि काही आवश्यक व्हिटॅमिनची कमतरता ही देखील असतात.
advertisement
advertisement
advertisement
आयास आयुर्वेदिक चिकित्सालयाचे डॉ. हर्ष यांनी यावर मार्गदर्शन करताना सांगितले की, त्वचेत कोरडेपणा येण्यापूर्वी बचाव करणे आणि आल्यानंतर योग्य उपचार करणे, हे दोन्ही महत्त्वाचे आहे. ते म्हणतात की, कोणत्याही समस्येवर 'मूळापासून' उपचार करणे गरजेचे असते. जसे झाडाच्या मुळांना पोषण मिळाल्यावरच त्याची पाने हिरवी राहतात. तसेच आपल्या त्वचेसाठी आपली नाभी हे एक महत्त्वाचे मूळ मानले जाते.
advertisement
डॉ. हर्ष यांनी एक अत्यंत प्रभावी आणि सोपा आयुर्वेदिक उपाय सांगितला आहे. रोज रात्री झोपण्यापूर्वी नाभीमध्ये मोहरीचे तेल किंवा देशी तूप लावावे. नाभी शरीरातील अनेक नाड्यांशी जोडलेली असते आणि त्यात तेल लावल्याने संपूर्ण शरीरातील नाड्यांना पोषण मिळते. यामुळे त्वचेतील नैसर्गिक ओलावा टिकून राहण्यास मदत होते आणि कोरडेपणाची समस्या दूर होते. हा उपाय नियमित केल्यास त्वचा आतून निरोगी राहते आणि नैसर्गिकरीत्या चमकते.
advertisement
त्वचेमध्ये कोरडेपणा आधीच आला असेल, तर नाभीच्या उपायासोबतच नियमित मॉइश्चरायझिंग करणे देखील आवश्यक आहे. यासाठी खोबरेल तेल, ग्लिसरीन आणि कोरफड यांचा वापर खूप प्रभावी ठरतो. कोरफडीचा ताजा गर त्वचेवर लावल्यास त्वचेला त्वरित हायड्रेशन मिळते आणि रूक्षता कमी होते. यासोबतच, दोन चमचे कोरफडीचा गर खाल्ल्याने शरीर आतून हायड्रेटेड राहते आणि त्वचेला दीर्घकाळ ओलावा मिळतो, ज्यामुळे त्वचा नैसर्गिकरीत्या चमकते.
advertisement