Ashadhi Ekadashi 2025: आषाढी एकादशीला उपवास धरताय? पण ही चूक पडू शकते आरोग्यासाठी महाग

Last Updated:
Ashadhi Ekadashi 2025: उपवास सोडताना केलेल्या चुकांमुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. त्यामुळे उपवास करत असताना आहारात काय घ्यावं? उपवास सोडताना कोणता आहार घ्यावा? याबाबत माहिती डॉ. धीरज आंडे यांनी दिली आहे.
1/7
आषाढी एकादशीला अनेकजण उपवास धरतात. अगदी लहान मुले सुद्धा आपल्याला एकादशीचा उपवास करताना दिसतात. उपवास करण्यामागे धार्मिक उद्देश असला तरी उपवास धरल्याने शरीराला अनेक फायदे होतात. उपवास केल्याने पचनसंस्थेचे कार्य सुधारते. पण, अनेक लोक उपवास तर व्यवस्थित करतात पण नेमका तो सोडायच्या वेळी चुका करतात.

advertisement
2/7
उपवास सोडताना केलेल्या चुकांमुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. त्यामुळे उपवास करत असताना आहारात काय घ्यावं? उपवास सोडताना कोणता आहार घ्यावा? याबाबत माहिती डॉ. धीरज आंडे यांनी दिली आहे.

3/7
उपवास सुरू असताना आहार कसा असावा? अनेकजण उपवास करतात आणि दिवसभर काही न काही खात असतात. पण, ते आरोग्याच्या दृष्टीने योग्य नाही. अनेकजण जर तर दिवसभर चहा पितात. आमचा उपवास फक्त चहावर असतो असे अनेक वेळा आपण ऐकतो. पण त्यामुळे आरोग्याला हानी पोहोचते. त्यामुळे उपवास सुरू असताना हलका आहार घ्यायला पाहिजे. दूध, फळे याचा समावेश तुम्ही आहारात करू शकता. त्याचबरोबर साबुदाणा, राजगिरा, रताळे आणि इतर पदार्थ सुद्धा अगदी कमी प्रमाणात तुम्ही घेऊ शकता. तेलकट पदार्थ खाणे टाळा त्यामुळे ॲसिडिटी होऊन डोकेदुखी सुरू होण्याची शक्यता असते. त्यामुळे संतुलित आणि पौष्टिक आहार तुम्ही उपवास सुरू असताना घ्यायला पाहिजे.

4/7
उपवास सोडताना आहार कसा असावा? कोणताही उपवास सोडताना सर्वप्रथम शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढणे महत्त्वाचे ठरते. त्यासाठी सर्वात आधी पाणी पिणे गरजेचे आहे. त्यानंतर मग हळूहळू दही, ज्यूस, नारळ पाणी किंवा लिंबू सरबत इत्यादी तुम्ही पिऊ शकता.

5/7
उपवास सोडताना आहारात काय घेऊ नये? या याबाबत माहिती देताना डॉ. धीरज आंडे सांगतात की, अनेकजण संपूर्ण दिवस उपवास करतात आणि दुसऱ्या दिवशी उपवास सोडताना चहा आणि बिस्किट किंवा ब्रेड खातात. पण, ते आरोग्यासाठी चांगले नाही. उपाशी पोटी चहा आणि मैदायुक्त पदार्थ सेवन केल्याने खूप जास्त ॲसिडिटीचा त्रास होऊ शकतो. त्याचबरोबर अनेकजण उपवास सोडताना मसाल्याचे पदार्थ सेवन करतात.

6/7
उपवास केल्यानंतर पोट रिकामे असते त्यामुळे सोडताना हलका आहार घेणे योग्य राहील. मसालेदार पदार्थ किंवा चमचमीत आहार घेतल्याने ॲसिडिटी, अपचन, पोटदुखी यासारख्या समस्या निर्माण होतात. त्याचबरोबर आंबट फळे सुद्धा खाणे टाळायला पाहिजे. उपाशीपोटी आंबट फळे सेवन केल्यास सुद्धा ॲसिडिटीचा त्रास होऊ शकतो.

7/7
तसेच दिवसभर उपवास केल्याने शरीरात कमजोरी जाणवते. तेव्हा उपवास सोडताना प्रोटीनयुक्त पदार्थांचे तुम्ही आहारात करू शकता. त्याचबरोबर जेवणात तुम्ही कडधान्य भाज्यांचा समावेश करून सात्त्विक आहार घेऊन उपवास सोडू शकता. उपवास सोडत आहोत म्हणून अनेकजण एकावेळी वेगवेगळे पदार्थ खातात. ते सुद्धा टाळायला पाहिजे, असे डॉ. धीरज आंडे यांनी सांगितले.

OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement