advertisement

Bone Caner Symptoms : हाडांमध्ये सतत वेदना होतात? दुर्लक्ष करू नका, असू शकते हाडांच्या कॅन्सरचे लक्षण!

Last Updated:
कॅन्सरचं नाव ऐकताच अनेकांना मृत्यू होण्याची भीती वाटू लागते. कॅन्सरचे अनेक प्रकार आहेत. यामध्ये स्तनांचा कॅन्सर, फुफ्फुसाचा कॅन्सर, गर्भाशयाचा कॅन्सर आणि आतड्यांसंबंधी कॅन्सर सर्वात सामान्य आहेत. सुरुवातीच्या अवस्थेत कॅन्सरचे निदान झाले नाही, किंवा त्यावर योग्य वेळी उपचार सुरू झाले नाहीत, तर हा आजार प्राणघातक ठरू शकतो. असाच एक कॅन्सर म्हणजे हाडांचा कॅन्सर. मायोक्लिनिकच्या एका रिपोर्टनुसार हाडांचा कॅन्सर म्हणजे हाडांमध्ये कॅन्सरच्या पेशींची वाढ सुरू होणे. हाडांचा कॅन्सर कोणत्याही हाडांमध्ये उद्भवू शकतो, परंतु याचा सामान्यत: मांडीच्या हाडांवर जास्त परिणाम होतो. चला तर, या कॅन्सरची पाच प्रमुख लक्षणे जाणून घेऊ.
1/6
सतत हाडं दुखणं : मायोक्लिनिकच्या रिपोर्टनुसार, हाडांमध्ये सतत दुखणे हे हाडांच्या कॅन्सरचं सुरुवातीचे लक्षण असू शकते. ही वेदना अधिक तीव्र असते, व विश्रांती घेतल्यानंतरही ती दूर होत नाही. कधीकधी रात्री वेदना अधिकच असह्य होतात. ही वेदना कॅन्सरसंबंधित पेशींमुळे होत असते. या पेंशीमुळे हाडांच्या कार्यावर आणि संरचनेवर परिणाम होतो.

2/6
 सूज येणे, गाठ तयार होणे : जेव्हा एखाद्या व्यक्तीला हाडांचा <a href="https://news18marathi.com/photogallery/lifestyle/saree-and-cancer-relation-what-is-sari-cancer-see-how-it-happens-and-how-to-prevent-it-mhpj-1158762.html">कॅन्सर</a> होतो, तेव्हा त्याला अंगावर एखाद्या ठिकाणी सूज येणं, गाठ तयार होणं, अशा समस्या सुरू होऊ शकतात. कॅन्सरच्या पेशींमुळे प्रभावित झालेल्या भागात बऱ्याचदा सूज येते. अशावेळी अनेकजण संधिवात किंवा दुखापत म्हणून त्याकडे दुर्लक्ष करतात. पण अशी सूज सतत येत असेल, गाठ दिसत असेल, तर नक्कीच चेकअप करून घ्या.
सूज येणे, गाठ तयार होणे : जेव्हा एखाद्या व्यक्तीला हाडांचा कॅन्सर होतो, तेव्हा त्याला अंगावर एखाद्या ठिकाणी सूज येणं, गाठ तयार होणं, अशा समस्या सुरू होऊ शकतात. कॅन्सरच्या पेशींमुळे प्रभावित झालेल्या भागात बऱ्याचदा सूज येते. अशावेळी अनेकजण संधिवात किंवा दुखापत म्हणून त्याकडे दुर्लक्ष करतात. पण अशी सूज सतत येत असेल, गाठ दिसत असेल, तर नक्कीच चेकअप करून घ्या.
advertisement
3/6
वारंवार फ्रॅक्चर होणे : हाडांच्या कॅन्सरमुळे हाडं कमकुवत होतात. यामुळे ते लवकर मोडतात. अनेकदा किरकोळ दुखापतीमुळे हाडं मोडतात. खरं तर कॅन्सरच्या पेशींच्या नकारात्मक प्रभावामुळे असे होत असते. या पेशी हाडांना कमकुवत बनवत असतात. कॅन्सरग्रस्त हाडं कमकुवत होत असल्याने अशा रुग्णांमध्ये फ्रॅक्चर होण्याचा धोका जास्त असतो.

4/6
 ताप आणि घाम येणे : जर तुम्हाला वारंवार ताप येत असेल, रात्री झोपताना घाम येत असेल, तर ही हाडांच्या <a href="https://news18marathi.com/lifestyle/cancer-in-youth-large-number-of-youth-in-india-are-suffering-from-cancer-due-to-this-reason-mhpj-1158798.html">कॅन्सरची लक्षणं</a> असू शकतात. कारण शरीराची रोगप्रतिकारक शक्ती सतत कॅन्सरच्या पेशींशी लढत असते. यामुळे ताप येतो. तर, काहींना रात्री घाम येतो. याचा अर्थ कॅन्सर वरच्या स्टेजचा आहे.
ताप आणि घाम येणे : जर तुम्हाला वारंवार ताप येत असेल, रात्री झोपताना घाम येत असेल, तर ही हाडांच्या कॅन्सरची लक्षणं असू शकतात. कारण शरीराची रोगप्रतिकारक शक्ती सतत कॅन्सरच्या पेशींशी लढत असते. यामुळे ताप येतो. तर, काहींना रात्री घाम येतो. याचा अर्थ कॅन्सर वरच्या स्टेजचा आहे.
advertisement
5/6
वजन कमी होणे : व्यायाम न करता, कष्ट न करता, जर तुमचे वजन सतत कमी होत असेल, तर दुर्लक्ष करू नका. काही वेळा हे एखाद्या धोकादायक आजारामुळेदेखील होत असतं. यामध्ये सकस आहार घेतल्यानंतरही सुधारणा जाणवत नसेल, तर नक्की चेकअप करून घ्या. हाडांच्या कॅन्सरमुळे देखील असं होऊ शकतं. विशेषत: हा कॅन्सर पाय, पाठीचा कणा, मांडीच्या हाडांमध्ये झालेला असेल. यामुळे चालणंदेखील अवघड होतं. कॅन्सरने प्रभावित झालेल्या हाडांमध्ये वेदना होते, अशक्तपणा येतो. एकंदरीत आरोग्यावर विपरीत परिणाम होतो.

6/6
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.)

सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान; सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय, ज्याचा कोणी विचारच केला नव्हता
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान, सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय...
  • सोनं विसरा, हा पर्याय पाहा

  • गुंतवणुकीचा सर्वात मोठा 'गेम' उघड

  • एका निर्णयाने तुमचं नशीब बदलू शकतं

View All
advertisement