Fig Benefits in winter: हिवाळ्यात ‘हे’ फळ खाल्ल्याने होतील अनेक फायदे, साध्या आजारांपासून लैंगिक समस्यावर गुणकारी आहे 'हे' फळ
- Published by:Tushar Shete
Last Updated:
Benefits of Fig in Marathi: हिवाळ्यातल्या संभाव्य आजारांपासून जर तुमचं रक्षण करायचं असेल तर व्हिटॅमिन्स आणि विविध पोषकतत्वं असलेली फळं खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात. अंजीर हे असंच एक पोषकतत्वांनी परिपूर्ण असं फळ आहे. अंजीर हे एकमात्र असं फळ आहे जे ताजं आणि सुकवून दोन्ही पद्धतीने खाता येतं. ओल्या अंजीरात व्हिटॅमीन ए जास्त प्रमाणात असतं तर सुकवलेल्या अंजिरात पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि सल्फर भरपूर प्रमाणात आढळून येतात. जाणून घेऊयात हिवाळ्यात अंजीर खाण्याचे फायदे.
अंजीरात मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सीडंट्स आढळून येतात. जे हृदयाच्या आरोग्यासाठी फायद्याचे असतात. नियमितपणे अंजीर खाल्ल्याने हृदयाची कार्यक्षमता वाढायला मदत होते. ज्यांना रक्तदाब किंवा हायब्लडप्रेशरचा त्रास आहे अशा रूग्णांनी अंजीर खाणं फायद्याचं ठरतं. अंजीर खाल्ल्याने रक्तदाब नियंत्रित राहायला मदत होते.
advertisement
advertisement
अंजीराच्या असलेल्या दाहक विरोधी गुणधर्मांमुळे दातदुखीच्या समस्येवर अंजीर खाणं गुणकारी ठरू शकतं. अंजीराच्या झाडाचं दूध हे विविध दंतविकारांवर गुणकारी आहे. त्या अंजिराच्या दुधात कापूस भिजवून तो किडलेल्या दातांखाली ठेवला तर दातांमधले किडे मरून जातात. याशिवाय हिरड्यांमधून रक्त येणे थांबते. तोंडाच्या दुर्गंधीवरही अंजीर गुणकारी आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement