Famous Lemon Tea Pune : पुण्यात लेमन टी प्यावी तर इथंच, खवय्यांची मोठी पसंती
- Reported by:Prachi Balu Kedari
- Published by:Mohan Najan
Last Updated:
पुणे शहराची खाद्यसंस्कृती ही जगभरात नावाजली जाते. मिसळपाव, भेळ, वडापाव, मसाला दूध अशा अनेक पदार्थांबरोबरच येथे चहा आणि लेमन टीचीही स्वतंत्र अशी परंपरा आहे.
पुणे शहराची खाद्यसंस्कृती ही जगभरात नावाजली जाते. मिसळपाव, भेळ, वडापाव, मसाला दूध अशा अनेक पदार्थांबरोबरच येथे चहा आणि लेमन टीचीही स्वतंत्र अशी परंपरा आहे. एफसी रोडवर असलेले हिराबाई महाडिक लेमन टी हे ठिकाण आजही पुणेकरांच्या खास पसंतीस उतरले आहे. 1992 मध्ये सुरू झालेल्या या छोट्या व्यवसायाने आज तब्बल 33 वर्षांचा प्रवास पूर्ण केला आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
सुरेश धानवले सांगतात की, लेमन टीचा हा प्रवास फक्त व्यवसायापुरता नाही, तर पुण्याच्या खाद्यपरंपरेचा एक महत्त्वाचा भाग झाला आहे. दररोज शेकडो ग्राहक या ठिकाणी येतात. अनेक तरुणाई, ज्येष्ठ नागरिक, तसेच परदेशी पर्यटकही येथे चहा घेण्यासाठी थांबतात. लेमन टीची चव जरी साधी असली तरी त्यातली सातत्याची परंपरा ही खरी ताकद आहे.
advertisement
advertisement








