पावसाळ्यात अंजीर खाण्याचे जबरदस्त फायदे, कसं आणि कधी खावं? पूर्ण माहिती
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
पावसाळ्यात सर्दी, खोकला, ताप, इत्यादी साथीचे आजार झपाट्यानं पसरतात. त्यामुळे या काळात आरोग्य खूप जपावं लागतं. भरपूर पौष्टिक तत्त्व मिळतील असा आहार घेणं आवश्यक असतं. अशाच एका पौष्टिक तत्त्वांनी परिपूर्ण फळाबाबत माहिती जाणून घेऊया. (आकाश कुमार, प्रतिनिधी / जमशेदपूर)
advertisement
advertisement
डॉक्टरांनी सांगितलं की, अंजीरमध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि मिनरल्स भरपूर प्रमाणात असतात. हे फळ त्वचेसाठीसुद्धा <a href="https://news18marathi.com/lifestyle/health/home-remedies-for-headaches-and-digestive-disorders-mhij-1226714.html">फायदेशीर</a> ठरतं. यामुळे त्वचेतला ओलावा टिकून राहतो आणि नैसर्गिक तेज येतं.
advertisement
अंजीरमध्ये असलेल्या ओमेगा-3, ओमेगा-6 फॅटी अॅसिड्समुळे कोलेस्ट्रॉलची पातळी उत्तम राहते. ज्यामुळे हृदयविकारांचा धोका कमी होतो. आपण दररोज नाश्त्यात किंवा रात्री झोपण्यापूर्वी अंजीर खाऊ शकता. गरम पाण्यात भिजवून खाल्ल्यानंही अंजीर <a href="https://news18marathi.com/lifestyle/health/lose-your-weight-fast-with-weight-loss-fasting-mhij-1226781.html">आरोग्यासाठी फायदेशीर</a> ठरतं.
advertisement
सूचना : इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. तरी आपण आपल्या <a href="https://news18marathi.com/lifestyle/health/you-will-never-throw-away-lemon-peels-after-reading-this-mhij-1226830.html">आरोग्याबाबत</a> कोणताही निर्णय घेण्यापूर्वी स्वतः डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कोणत्याही नुकसानासाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.


