झटपट करा नाश्त्यासाठी विदर्भातील ‘ही’ गोड रेसिपी; बनवण्याची सोपी पद्धत पाहा
- Published by:News18 Marathi
- local18
Last Updated:
नाश्त्यासाठी नवीन डिश काय करावी असा प्रश्न गृहिणींना सतावत असतो. पण विदर्भात फेमस असणारी रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता.
रोज नाश्त्यासाठी तेच तेच पदार्थ खाऊन बऱ्याचदा कंटाळा येतो. तेव्हा नाश्त्यासाठी नवीन डिश काय करावी असा प्रश्न गृहिणींना सतावत असतो. पण विदर्भात फेमस असणारी रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता. विशेष म्हणजे घरात उपलब्ध साहित्यातूनच हा खास पदार्थ तयार होतो. याच झटपट आणि कमी साहित्यातून बनणाऱ्या कणकेच्या गोड आयत्यांची रेसिपी वर्धा येथील गृहिणी कुमुद गायकवाड यांनी सांगितली आहे.
advertisement
advertisement
सर्वप्रथम एका भांड्यात गव्हाचे पीठ घेऊन त्यात चवीनुसार साखर ऍड करायची. हे महत्त्वाचे साहित्य झाल्यानंतर त्यात वेलची पूड आणि चवीनुसार मीठ ऍड करायचं आहे. आता या मिश्रणात पाणी ऍड करून जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही इतपत तयार करायचं आहे. या मिश्रणात गव्हाची कणिक चांगली भिजली पाहिजे मिश्रणात गाठी राहता कामा नये.
advertisement
advertisement
advertisement










